टोमॅटोची माहिती मराठी । Information About Tomato in Marathi

Information About Tomato in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” टोमॅटोची माहिती मराठीInformation About Tomato in Marathi घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

टोमॅटोची माहिती मराठी । Information About Tomato in Marathi

Information About Tomato in Marathi :

जगभरामध्ये विविध फळभाज्या पाहायला मिळतात. शरीरासाठी अतिशय पोषक आणि आरोग्यदायी असलेल्या पालेभाज्यांना आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

मराठीमध्ये टोमॅटोला ला टोमॅटो, बेदरे किंवा बेलवांगे नावाने ओळखले जाते. ब्रिटिश काळामध्ये टोमॅटोला ‘ तांबेटे ‘ म्हणून ओळखले जात असे. तर संस्कृत भाषेमध्ये टोमॅटोला हिण्डीर नावाने ओळखले जाते. हिण्डीर म्हणजेच रक्तवृत्नाक असे संबोधले जाते.

टोमॅटो हे दिसायला सुंदर खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असते. टोमॅटो मध्ये भरपूर मात्रा मध्ये विटामिन आणि कॅल्शियम असते. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. स्वयंपाक घरामधील कुठलीही भाजी अथवा रेसिपी करायचे असेल तर टमाट्याची गरज भासतेच. त्यामुळे टमाटा ला स्वयंपाक घरातील बादशहा असे म्हटले जाते.

त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये टमाट्याची महत्त्व अनन्यसाधारण आहे.

टोमॅटो चा इतिहास History of Tomatoes :

या सजीव सृष्टी मध्ये माणसाला टोमॅटो ची ओळख इसवी सन 1554 च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात सापडते. टोमॅटो ही मूळची पेरू देशातील वनस्पती आहे.

इसवी सन 1550 च्या सुमारात युरोपियन देशातील काही भागांमध्ये टमाट्याची लागवड करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर ब्रिटन, स्पेन, मध्य युरोपियन देशांनी टोमॅटोला औषधी वनस्पती समजून त्याची लागवड करण्यास सुरुवात केली. अमेरिकन थॉमस जेकर्सने 1781 च्या सुमारास व्हर्जीनिया मध्ये प्रथम टमाट्याची लागवड केली.

त्यानंतर अठराशे सालापासून टोमॅटोचा अन्नपदार्थांमध्ये समावेश करण्यात आला.

भारतामध्ये टमाट्याची माहिती आणि समावेश 1900 सालापासून करण्यात आला आहे.

टोमॉटो फळातील रंगद्रव्य Tomato Fruit Pigment :

टोमॅटोला लाल रंग हा त्यातील असलेल्या रंग द्रव्यामुळे प्राप्त झाला आहे. लाल रंगाच्या टोमॅटोच्या तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटो मधील लायकोपीन हे रंगद्रव्य आपल्या शरीरामध्ये सहजपणे शोषले जातात. लाल रंगाच्या टोमॅटोमधील लायकोपिन हे रंगद्रव्य ट्रेत्रा सिस मध्ये उपलब्ध असते. हे रंगद्रव्य आपल्या शहरांमध्ये सहज रित्या शोषले जात नाही.

लाल टोमॅटो जेवणाची चव वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. टोमाॅटो ला लाल रंग देणारा तत्व म्हणजे लायकोपीन जे आपल्या शरीरासाठी फायदेमंद असते. कच्चे टमाटर पेक्षा टमाटो पिकल्यानंतर अधिक प्रभावी दिसतात. तसेच टमाटो प्रत्येक ऋतू साठी फायदेशीर ठरतात.

टोमॅटोमधील पोषक तत्वे Nutrients in Tomatoes :

टोमॅटो हे साधारणता चवीला आंबट असते कारण यामध्ये सायट्रिक ऍसिड चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात पाहायला मिळते.

टोमॅटो हा विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के आणि विटामिन ई चाचांगला स्त्रोत मानला जातो. हे सर्व विटामिन्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जातात त्यामुळे टोमॅटो हे आरोग्यासाठी लाभदायक आहे.

याव्यतिरिक्त टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. तसेच टोमॅटोमध्ये कॅल्शियम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखे तत्व असतात.

त्याप्रमाणेच टोमॅटोमध्ये विपुल प्रमाणात एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण हे आढळते. जे कॅन्सर आणि हृदयरोग सारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरते.

टोमॅटो लाल रंग हा त्यातील लायकोपीन मुळे प्राप्त झाला आहे. आणि हे लायकोपेन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

टोमॅटोचे महत्त्व आणि उद्योग प्रक्रिया Importance of Tomatoes and Industry Processes :

टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी, टमाट्याच्या सुधारित जातींचा लाल भडक आकर्षित रंग, आकार व चव यामुळे बाजारपेठांमध्ये टोमॅटोला विशेष मागणी आहे.

टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबीर मध्ये सर्रास वापर केला जातो. शहरी भागामध्ये टोमाॅटो यांचा वापर किचनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. टोमॅटो चा वापर सुप, केचप, ज्यूस, टोमॅटो लोणचे, टोमॅटो पुरी इत्यादी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात.

भारतामध्ये कमी वेळात चविष्ट पदार्थ बनवण्याकरता टोमॅटो चटणी चा वापर केला जातो. बाजारामध्ये टोमॅटो पासून बनलेले आंबट चटणी, गोड चटणी आणि तिखट चटणी चाखायला मिळते.

बाजारामध्ये टमाट्याची वाढती मागणी यामुळे व्यापारीदृष्ट्या टोमॅटो महत्त्वाचं ठरत आहे.

टोमॅटो चे प्रकार Types of Tomatoes :

टोमॅटो ही अशी फळ भाजी आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म पाहायला मिळतात. जगभरामध्ये तमाशाचे 9 हजार ते 10 हजार प्रकार आढळतात त्यातील काही महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे;

1. चेरी टोमॅटो ( Cherry Tomato Information in Marathi ) :

हे आकाराने खूप लहान असतात इतके लहान की ते चेरी प्रमाणे दिसतात म्हणून या टोमॉटोंना चेरी टोमॅटो असे नाव देण्यात आले असावे.

हे टोमॅटो इतर टोमॅटो न पेक्षा खूप रसदार असतात. या टोमॅटो यांचा उपयोग शक्यतो सलाद मध्ये केला जातो.

2. रोमा टोमॅटो ( Roma Tomato Information in Marathi ) :

 रोमा टोमॅटोला रोमास मनुका टोमॅटो या नावाने ओळखले जाते. रोमा टोमॅटो चेरी टोमॅटो पेक्षा आकाराने थोडे मोठे असतात. हे टोमॅटो रसाळ आणि गोड असतात त्यामुळे यांचा वापर सर्रास बनविण्याकरिता केला जातो.

3. हेर्लूम टोमॅटो ( Heirloom Tomato Information in Marathi ) :

 हे टोमॅटोचा रंग फिकट गुलाबी असतो.  या प्रकारच्या टोमॅटोची चव गोड असल्याने हे टोमॅटो बनवण्याकरिता वापरले जातात.

4. बेटर बॉय टोमॅटो ( Better Boy Tomato Information in Marathi ) :

  बेटर बॉय टोमॅटो हा एक संकरित प्रकाराचा टोमॅटो असून या टोमॅटोचा रंग गडद लाल, मऊ व टोमॅटो आकाराने मोठे असतात.  या प्रकारच्या टोमॅटोचे पीक मुख्यता अमेरिका देशांमध्ये घेतले जाते.

5. मनी मेकर टोमॅटो ( Money Maker Tomato Information in Marathi ) :

 या जातीचे टोमाॅटो प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याने हे टोमॅटो मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. ह्या टोमॅटोचे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येत असल्याने या टोमॅटोला मनी मेकर टोमॅटो असे म्हणतात. टोमॅटोचा रंग लाल गडद असून याची चव गोड असते.

6. प्लम टोमॅटो ( Plum Tomato Information in Marathi ) :

 प्लम टोमॅटोला साधारण  पेस्ट टोमॅटो या नावाने ओळखले जाते. या प्रकारचे टोमॅटो साधारणता स्वास बनविण्याकरिता वापरतात. हे टोमॅटो आकाराने लांबट आणि प्लम सारखे दिसतात म्हणून यांना मॅटर असे म्हणत असावे.

टोमॅटो खाण्याचे फायदे Various Benefits of Tomatoes :

 टोमॅटो हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून याचे विविध फायदे आहेत ते पुढील प्रमाणे;

1. हाडे मजबूत बनवण्याकरिता :

 टोमॅटो मध्ये विटामिन ई के चे प्रमाण विपुल प्रमाणात आढळते.  विटामिन के हे शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.

2. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी :

 टोमॅटोच्या बियांमध्ये एंटीऑक्सीडेंट, बिटा- कॅरोटीन आणि लायकोपीन असते जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास सर्दी कमी होते.

3. दात मजबूत करण्यासाठी :

 टोमॅटोमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने टोमॅटो दात मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

4. वजन कमी करण्यासाठी :

 टोमॅटो मध्ये फायबरचे प्रमाण असल्याने नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

5. मऊ आणि  चमकदार त्वचेसाठी :

 टोमॅटो चा उपयोग आपली त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यासाठी केला जातो.

 टोमॅटोमध्ये लाइकोपिन आणि बीटा कॅरोटीन असतील जे आपल्या त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी मदत करते.

6. हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी :

 टोमॅटोमधील लाइकोपिन, बीटा कॅरोटीन, विटामिन ई, विटामिन सी यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे शरीरातील  केलेस्टेरॅल कमी करण्यासाठी मदत होते ज्यामुळे हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यामध्ये मदत होते.

7. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी :

 टोमॅटो मध्ये विविध प्रकारचे भाऊ शकतात व पाहायला मिळते. ज्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत होते.

 तर मित्रांनो ! ” टोमॅटोची माहिती मराठी । Information About Tomato in Marathi “ वाचून आपणास आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” Information About Tomato in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिली असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

 धन्यवाद मित्रांनो !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *