मी सरपंच झालो तर निबंध
आमच्या अंगणवाडीत अनेक गोष्टींमध्ये शिस्त नाहीये! गावात तशी बरीच अनुकुलता आहे, अजून शाळेची बिल्डिंग पडलेल्या अवस्थेतच आहे. ती इतकी वर्ष झाली तरी नीट केलेली नाही. कारण इकडची लोक म्हणतात खेडेगाव म्हटले की अनुकूलता आलीच! पण या सगळ्यांना हे कधी समजणार? की जरी गाव असले, तरीसुद्धा गावात आपण नीट सुख सुविधा युक्त अशा अवस्थेत राहू शकतो! गावाचा संपूर्ण कारभार हा ग्रामपंचायतीच्या नियमाखाली चालतो आणि ग्रामपंचायतीचा प्रमुख हा ‘सरपंच’ असतो. जर त्यानेच नीट काम केले नाही, तर गावाचा विकास कधी होणारच नाही!
मुळात भारतात सगळ्यात पहिल्यांदा शहरीकरण जेव्हापासून सुरू झाले, तेव्हापासून शहरांचा विकास याकडे सरकारचे जास्त लक्ष असते. गावातील विकासाकडे खूप कमी वेळा बघितले जाते. अशा वेळेला ज्यांच्याकडे कारभार सोपवला आहे, अशा लोकांनी देखील कामे केली नाही. तर गावाचा विकास होणे अशक्य आहे. परंतु मी या गावचा एक सुजाण नागरिक म्हणून, गावासाठी काम करू इच्छितो. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मला कोणते तरी पद मिळेल. अन्यथा गावातली लोकं मला काम करू देणार नाही. म्हणूनच मला गावचा सरपंच व्हायचे आहे!
जर मी सरपंच झालो तर, गावासाठी येणारे सगळे अनुदानाची रक्कम ही मी फक्त त्या गावच्या भल्यासाठीच वापरेल. सगळा पैसा हा त्या गावाच्या विकासासाठी उपयोगी होईल. कारण आज पर्यंत गावासाठी मिळालेले अनेक हजार अनुदाने ही अशीच वाया गेलेली आहेत. एक रस्ता फक्त पक्का रस्ता आहे, बाकी गावातील सगळे रस्ते अजूनही कच्चेच आहेत. इथे खडक-माती याचे प्रमाण इतके आहे की, प्रत्येकाच्या नाकात तोंडात ती माती जाऊन गावांमध्ये सतत सर्दी-खोकला याची साथ चालू असते. धुळीमुळे लोकांना खूप जास्त प्रमाणात त्रास होतो. गर्भवती महिलांना रस्त्यावरून जाताना भीती वाटते, कारण कोणता दगड पायाखाली अडकून जर त्या पडल्या तर त्यांचे आणि त्यांच्या बाळांचे दोघांचेही नुकसान होईल. त्यामुळे लोक अजूनही गावात सतत फिरायला घाबरतात. अशा परिस्थितीत जर मी सरपंच झालो, तर सगळ्यात आधी रस्त्यांचे काम हाताशी घेईल आणि ते पूर्ण करेन.
त्यानंतर जी शाळेची बिल्डिंग, गेल्या कित्येक वर्षांपासून तशीच पडली आहे ती आधी नीट करेल. शाळा पूर्ण नीट झाल्यावर तिथे शिक्षकांची नियुक्ती करेन.
आता असणाऱ्या विहिरी खूप प्रमाणात तुटल्या आहेत, बऱ्याच घरात पाणीपुरवठा त्यामुळे होत नाही. त्यामुळे त्यांनंतर विहिरी बांधेल. लहान मुलांना दोन वेळेचे जेवणही जेवायला मिळत नाही. जितकं शेतात पिकत, तितकीच ती मुले खातात. त्यामुळे एक वेळेचा उपाशी राहून जी मुले जगत आहेत, त्यांना एक वेळेचे जेवण मोफत देईन.
शाळा बांधून झाल्यावर त्यानंतर महाविद्यालय बांधील. जेणेकरून बारावीपर्यंतचे शिक्षण तरी गावात झाले पाहिजे, तरच गाव संपूर्ण सुखसोईंयुक्त होईल.
शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान युक्त उपकरणे यांची माहिती सर्वप्रथम मी घेईन, मग ती सगळ्या शेतकऱ्यांना देईन. जेणेकरून त्यांचे शेतातले काम खूप सोपे होईल. शेतकऱ्यांना बियाणे कमी भावात तसेच काही बियाणे मोफत उपलब्ध करुन देइल, जेणेकरून जास्तीत जास्त शेती लोकांनी केली पाहिजे. त्यांच्या पुढच्या पिढीने देखील शेती करायला प्रवृत्त झाले पाहिजे.
ज्या लोकांचे वेतन दरमहा दहा हजाराच्या खाली आहे, त्यांना रेशन फ्री मध्ये देईल, सगळ्या गावातल्या मोठ्या नेत्यांशी नीट जुळवून घेईल. मुलींसाठी फी खूप कमी दरात ठेवेल जेणेकरून मुली शिकायला शाळेत येतील व सक्षम होतील आणि गावात कधीच हुंडा किंवा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन मुलींसोबत घडणार नाही याची काळजी घेईन.
गावातल्या कोणत्याच व्यक्तींवर मी कधीच अन्याय होऊ देणार नाही, सगळ्या गावात सुखकर वातावरण निर्माण करेल, जेणेकरून लोक सुखात राहतील.
पूर्वीच सरकार हे गावांना जास्त महत्त्व द्यायचे नाही, परंतु आता बदललेल्या सरकार कडून गावाचा विकास होईल अशी आशा आहे. मी सरपंच झाल्यावर गावातील प्रत्येक व्यक्ती कशी सुखी होईल? याच्याकडे जास्त भर देणार आहे! कारण सध्याची स्थिती खरच खूप बिकट आहे. त्यामुळे लोक गाव सोडून शहराकडे जातात. परंतु हा त्याच्या वरचा उपाय नाही. आपण गावातच जर सगळ्या सुख-सुविधा आणल्या तर जिकडे आपल्या जन्म झाला आहे त्या गावासाठी आपल्याला काम करायची संधी मिळते, हे खूप भाग्याचे आहे! ज्या गावाने आपल्याला लहानपणापासून जपले आहे, अशा गावासाठी आपण काम करणे महत्त्वाचे आहे!