दालचिनी बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Cinnamon in Marathi

Cinnamon in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” दालचिनी बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Cinnamon in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

दालचिनी बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Cinnamon in Marathi

Cinnamon म्हणजे काय ? Cinnamon म्हणजे दालचिनी. स्वयंपाक घरात वापरली जाणारी हे दालचिनी सर्वांच्या परिचयाची असेल. खाद्यपदार्थांना आणखीन स्वादिष्ट करण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो.

दालचिनी ही मुख्यता श्रीलंका आणि भारतातील केरळ राज्यात उगवणारे सदाहरित वृक्ष आहे. दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडपाचे सारखे असते. दालचिनी चे पूर्ण वाढ झालेले झाड हे सहा ते पंधरा मीटर एवढी असते.

दालचिनीच्या झाडाचे खोडाची साडे ही निवडून घेऊन त्याला वाळवतात. दालचिनीचा आकार कलौसारखा गोल, जाड ,मऊ आणि तांबूस रंगाचा असतो.

दालचिनीची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकते. अत्यंत सुपिक जमिनी पासून, मुरमाड जमिनीपर्यंत दालचिनीची लागवड केली जाते.

दालचिनी ला कलमी असेसुद्धा म्हटले जाते. दालचिनी ला एक प्रकारचा सुवासिक वास असतो. त्यामुळे दालचिनीचा वापर वापर सर्वत्र मसाला म्हणून आणि औषध म्हणून करतात.

तसेच दालचिनीच्या पानाचा वापर ” तेजपत्र “ म्हणून केला जातो. स्वयंपाक घरात आणि आयुर्वेदामध्ये दालचिनी ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दालचिनी हा एक प्रकारचा अतिशय स्वादिष्ट मसाला आहे.

दालचिनीचे मुख्यता दोन प्रकार पडतात, कॅसिया आणि सिलोन. परंतु या दोन प्रकारांचे दालचिनी चे औषधी गुणधर्म आहेत पुर्णता वेगवेगळ्या आहेत. दालचिनी तील सर्वात महत्त्वाचा सक्रिय घटक म्हणजे एक दालचिनी.

दालचिनीचा स्वाद आणि सुगंध यामुळे दालचिनीचा मसाल्यात वापर केला जातो. दालचिनी ला इंग्लिश मध्ये ” सिनाॅमन ( Cinnamon ) “ असे आहे. तर हा सिनॅमान शब्द ग्रीक भाषेतील सिंन्नामोमोन या शब्दापासून बनला आहे.

दालचिनी मधील काही महत्वाचे पौष्टिक तत्व Some Important Nutrients in Cinnamon :

दालचिनी मध्ये असं काही पौष्टिक तत्त्व आहेत ज्यामुळे त्याचा वापर आयुर्वेदामध्ये आणि स्वयंपाकामध्ये मसाला म्हणून केला जातो.

दालचिनी मध्ये असलेल्या काही पौष्टिक तत्त्वामुळे दालचिनी आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे.

दालचिनी मध्ये जीवनसत्व ‘क’ आणि ‘अ’ प्रमाण विपुल प्रमाणात आढळते. हे जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये आवश्यक असते ज्यांना या जीवनसत्त्वाची कमतरता आहे त्यांनी दालचिनीचे सेवन केल्यास त्यांच्यातील ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्वाचा प्रमाण वाढते.

त्या प्रमाणेच दालचिनी मध्ये अद्रता, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्, इत्यादी भस्म आढळतात.

तर फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, थायामिनी आणि निआसीन इत्यादी जीवनसत्व आहेत.

वरील सर्व जीवनसत्वे आणि पौष्टिक तत्त्वामुळे दालचिनी ही आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे.

दालचिनी उपयोग Cinnamon Use :

दालचीनीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.

गरम मसाला मध्ये दालचिनी चा वापर आवर्जून केला जातो.

भारतीय मसाल्यांमध्ये दालचिनी ला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. दालचिनीचे आरोग्यवर्धक तसेच सौंदर्य संदर्भात देखील भरपूर फायदे आहेत.

दालचिनी मधील औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीराचे आरोग्य प्रतिकारशक्ती वाढते.

  1. थंडीमुळे डोक दुखत असेल तर, दालचिनी पाण्यात लावून लेप लावावा. त्यामुळे तुरंत डोकेदुखी थांबेल.
  2. मुखदुर्गंधी आणि दातांना संबंधीच्या औषधांमध्ये दालचिनीचा वापर केला जातो.
  3. चेहऱ्यावरील मुरूम, डाग घालवण्यासाठी दालचिनीची चूर्ण लिंबू रसासोबत मिसळून लावावी.
  1. गोवर आलेल्या व्यक्तीस गोवर प्रतिबंध म्हणून दालचिनी लावली जाते.
  2. दालचिनी, मिरी पूड, आणि मध एकत्रित करून हे मिश्रण घेतल्यास पोट फुगत नाही पचनक्रिया व्यवस्थित चालते.

दालचिनी फायदे Cinnamon benefits :

दालचिनी चे आपल्या जीवनामध्ये बरेच फायदे आहेत. नियमित दालचिनीचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

दालचिनी ही चवीला तिखट गोड चवीचे असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, कफनाशक स्तंभक गुणधर्माचे आहे.

दालचिनी मनाची  अस्वस्थता कमी करते, यकृताचे सुधारणा करते आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.

1. पचन विकारास फायदेशीर Beneficial For Digestive Disorders :

दालचिनी पचन सुधारण्यासाठी पोटाचा गॅस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

ज्या व्यक्तींना अपचन, पोट दुखी,   अजीर्ण कमी होण्यासारख्या समस्या आहे तो त्यांनी दालचिनी, सुंठ, जिरे आणि वेलदोडे समप्रमाणात घेऊन व त्यांचे बारीक वाटून मिश्रण करावे. व हे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्यावे यामुळे  यामुळे पचन विकार कमी होण्यास मदत होते.

तसेच दालचिनी मिरी पूड आणि मध एकत्रित करून मिश्रण घ्यावे यामुळे पोट फुगत नाही.

तसेच दालचिनी मुळे मळमळ उलट्या आणि जुलाब यांच्या समस्या आढळतात.

2. सर्दी साठी फायदेशीर Beneficial For Colds :

दालचिनी हे सर्दी वर फायदेशीर ठरते. ज्या लोकांना सर्दीची समस्या आहे त्यांनी दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमूटभर मिरीपूड मग टाकून घेतले असता जुनाट सर्दी,  सुजलेला घसा आणि मलेरिया यांसारख्या समस्या कमी होतात.

3. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी To enhance the taste of cooking :

दालचिनी ही स्वयंपाकामध्ये मसाला म्हणून वापरले जाते. त्यामुळे जेवणाला स्वादिष्ट चव येते.  दालचिनीची पाने आणि अंतर साल केक, मिठाई आणि स्वयंपाकातील लज्जत वाढवण्यासाठी वाढ वापरली जाते.

तसेच दालचिनी चे तेल सुगंधी द्रव्यात, मिठाईमध्ये पाणी पेयात वापरले जाते.

4. स्त्रीरोग Gynecology :

दालचिनी ही  स्त्री रोगांवर ही खूप फायदेशीर ठरते. स्त्रियांमधील गर्भाशयाचे विकार, गनोरिया यावर दालचिनी उपयुक्त ठरते.

तसेच प्रसूतीनंतर महिनाभर दालचिनीचा तुकडा चघळ्यास  लवकर गर्भधारणा होत नाही.

दालचिनी चे सेवन केल्याने   स्तना मधील दूध वाढते. गर्भाशय संकोच होतो.

 दालचिनी सेवन करताना घ्यायची काळजी Precautions to Be Taken While Consuming Cinnamon :

दालचिनीचा वापर करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते.

  1. दालचिनी ही उष्ण असल्याने उन्हाळ्यामध्ये दालचिनीचा वापर जास्त करू नये. केल्यास एलर्जी, शरीरावर डाग येऊ शकतात.
  2. तसेच दालचिनी चे अति सेवन केल्यास पित्त सुद्धा वाढू शकते.
  3. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीने दालचिनीचे सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तर मित्रांनो ! ” दालचिनी बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Cinnamon in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” Cinnamon in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *