जाहिरात लेखन मराठी

Featured Image - jahirat lekhan marathi

जाहिरात लेखन मराठी

मुळातच ऍडव्हर्टाईसमेंट किंवा जाहिरात हा सध्याच्या काळात खूप महत्त्वाचा असा घटक आहे. मार्केटिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जाहिरात लेखन! आपल्या दैनंदिन आयुष्याचा जाहिरात हा एक अविभाज्य घटक आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी वापरत असतो. त्या गोष्टी आपण बाजारातून विकत आणलेल्या असतात. या सगळ्या गोष्टींचे मार्केटिंग हे फक्त जाहिरात लेखन करू शकते. कारण जाहिरात ही एवढे महत्वाचे मीडियम आहे की कंपनी चा प्रॉफिट आणि लॉस हे जाहिराती वरच अवलंबून असतो! कारण आपल्या भारतीय लोकांची विचार सारणी अशीच आहे ‘जो दीखता हें वही बीकता हें!’ आणि त्यासाठी चांगली जाहिरात महत्वाची आहे.

  मुळात पूर्वीच्या काळात अनेक गोष्टी आपण घरातच बनवायचो. परंतु आता आपण सगळ्या गोष्टींसाठी बाजारातील प्रोडक्स वर अवलंबून आहोत. जसे पूर्वीच्या काळी दळण हे जात्यावर दळले जायचे, परंतु आता आपल्याला चक्की-मिक्सर हे उपकरण घरात आणून त्यावर दळायची सवय झाली आहे. हे असे फक्त एकाच गोष्टीत नाही तर अनेक गोष्टींमध्ये आहे. म्हणूनच जाहिरात हा आपल्या जगण्याचा एक आविभाज्य घटक बनला आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात जर जाहिरात नसेल तर आपल्याला बाजारात काय नवीन आले आहे हे कळणारच नाही!

  जाहिरात लेखन तसे खूप सोपे असते. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती आपल्याला जाहिरातीत द्यावी लागते! त्याचे कारण लोकांकडे जाहिरात पूर्ण वाचायला वेळ नसतो. त्यामुळे लहानश्या जाहिराती मध्ये आपल्याला आपल्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती देणे, हे जाहिरात लिखाणाचे सगळ्यात महत्त्वाचे तत्व आहे.

  जाहिरात लेखनातील काही महत्त्वाचे टप्पे हळूहळू जाणून घेऊया. मुळात जाहिरात लिहिण्यासाठी आधी हेडलाईन, बेसलाईन, आणि मधला भाग असे तीन प्रकार असतात. मधल्या भागात चित्र किंवा काहीतरी छान फोटो लावला जातो. जर आपण प्रिंट माध्यमासाठी जाहिरात लेखन करत आहोत, तर या गोष्टींचा वापर केला जातो. जर आपण एखादी इलेक्ट्रॉनिक म्हणजेच टीव्हीवर दाखवणारी ऍड लिहीत असू तर त्याचे जाहिरात लिखाण खूप वेगळ्या पद्धतीने केले जाते.

  आपण आज छापील माध्यमाच्या घरात लिखाण कसे करावे हे जाणून घेऊया. जाहिरात लिखाण करताना घ्यावयाची काळजी-

1. प्रॉडक्ट नीट समजून घेणे- जाहिरात लिखाण करताना नेमके आपण कोणत्या प्रॉडक्ट बद्दल लिहितो आहे याची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण ज्या कोणत्या प्रोडक्टसाठी लिहीत असून ते प्रॉडक्ट कशासाठी वापरले जाते, बाजारात ते कुठे मिळते. आणि लोकांना ते कसे उपलब्ध होईल, या सगळ्या गोष्टींची आधी तपासणी करून घ्यावी.

2. कंपनीचा नीट इतिहास तपासून घ्यावा- जाहिरात लिखाण करत असताना प्रॉडक्ट नॉलेज बरोबर कंपनी ही नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी काम करते. तसेच ही कंपनी भारतीय आहे का? परदेशी आहे? हे देखील जाणून घ्यावे. कारण जेव्हा तुम्ही जाहिरात करत असता, त्यावेळेला तुमचा ऑडियन्स हा जरी भारतीय असला, तरी सुद्धा काही जाहिराती या परदेशात देखील दाखवल्या जातात. त्यामुळे तुमचा ब्रँड हा भारतीय कंपनी आहे की परदेशी कंपनी आहे हे नीट तपासून घ्या.

3. कथा किंवा कन्सेप्ट तयार करणे- जाहिरात लेखन करत असताना कोणत्यातरी एका कथेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ला एक्सप्लेन करत असता. त्यामुळे तुमची जी कथा आहे किंवा कन्सेप्ट आहे, ती खूप छोट्या शब्दात तुम्हाला चांगले मांडता आली पाहिजे. त्यामुळे ती कथा किंवा कन्सेप्ट आधी डोक्यात तयार करून घ्या.

4. चित्र ठरवणे- जाहिरात लिखाण करत असताना ती जाहिरात आकर्षित करण्यासाठी लिखाणाबरोबरच चित्र देखील चांगले असणे गरजेचे आहे. कारण चांगले चित्र ऑडियन्सला आकर्षित करते. त्यामुळे चित्राचे सिलेक्शन व्यवस्थित होणे गरजेचे असते.

5. कविता यमक या गोष्टींचा वापर करावा- जाहिरात लिखाणात तुम्हाला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती द्यायची असल्याकारणाने तुम्ही त्या वेळेला चारोळी, कविता किंवा कोणतेही यमक जोडाक्षरे या गोष्टींचा वापर केल्याने तुमची जाहिरात जास्त आकर्षित करेल.

6. जाहिरातीची रूपरेषा ही आकर्षक असावी- त्यावेळी जाहिरात लिहून पूर्ण होते आणि चित्रही काढत होते त्या वेळेला त्याची रूपरेषा म्हणजेच मागची बॅकग्राऊंड, पुढची बॅकग्राऊंड आणि बॉर्डर ही आकर्षित असणे गरजेचे आहे.

7. जाहिरातीतून काहीतरी चांगल्या संदेश देणे- पूर्वीपासूनच ज्या जाहिराती समाजसुधारणा किंवा कोणताही सोशल मेसेज देत आहेत. अशा जाहिराती फार प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे तुम्हाला जर तुमची जाहिरात खूप चांगली बनवायची असेल, तर एखादा छोटासा संदेश समाजाला द्याल अशा प्रकारच्या कथा किंवा कन्सेप्ट लिहा जेणेकरून तुमची जाहिरात प्रसिद्ध व्हायला मदत मिळेल.

  सध्याच्या आधुनिक युगात एवढी कॉम्पिटिशन असताना, आपला ब्रँड सगळ्यात पुढे असला पाहिजे. यासाठी जाहिरात लेखनात मेहनत करावी लागते. जाहिरात लिखाणाचे फायदे हे तुमच्या प्रॉडक्ट ला सगळ्यात बसून वेगळं सिद्ध करतात. चांगली जाहिरात तुमचा बिजनेस वाढवण्यात मदत करते. तसेच तुम्ही नक्की कोणत्या प्रॉडक्ट वर काम करता याची जाणं लोकांना होते. लोक तुमच्या ब्रँड बद्दल चर्चा करायला सुरुवात करतात, म्हणजेच काय तर जाहिरात क्षेत्रात प्रेक्षकांना खेळवून ठेवणे गरजेचे असते. तुम्ही वर दिलेल्या पद्धतीने जर जाहिरात लिखाण केले तर तुमची जाहिरात नक्कीच चांगली चालेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *