Pcod full form in Marathi | पीसीओडी म्हणजे काय?

By Information Essay •  1 min read

आज-काल महीलांच्या आरोग्या संबंधित अनेक समस्या दिसून येत आहेत. सर्वसाधारण सर्वांचा महिलांमध्ये पहायला येणारे एक मात्र समस्या म्हणजे अनियमित मासिक पाळी किंवा मासिक पाळीच्या संबंधित काही समस्या. अलीकडच्या काही वर्षापासून तर पीसीओडी ह्या समस्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणे वाढताना दिसत आहे. बऱ्याचदा मुलींना मासिक पाळी अनियमित आल्याने वैद्यकीय सल्ला घेतल्यास डॉक्टर ही समस्या असल्याचे सांगतात. त्यामुळे पीसीओडी संबंधित सर्व माहिती प्रत्येक स्त्रीला माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Pcod full form in Marathi:

Pcod म्हणजे polycystic ovarian disease ज्याला मराठी भाषेमध्ये साधारणता मासिक पाळीच्या समस्या असे म्हटले जाते. बहुतांश स्त्रियांमध्ये आजकाल ही समस्या पाहायला मिळत आहे.

या समस्यांचा परिणाम काही वेळा स्त्रियांच्या गर्भधारणे वर देखील होतो त्यामुळे स्त्रियांसाठी ही गंभीर समस्या बनत चालली आहे व या समस्येबद्दल स्त्रियांना माहिती असणे गरजेचे आहे.

Pcod म्हणजे काय?

Pcod म्हणजे polycystic ovarian disease ही आरोग्याची समस्या फक्त असे यामध्ये पाहायला मिळतात. या समस्यांमध्ये स्त्रियांच्या अंडाशया मध्ये गाठी तयार होतात. ज्या स्त्रियांमध्ये ही समस्या पाहायला मिळते त्या स्त्रियांच्या अंडाशाया मध्ये गाठी तयार होतात व या गाठींचा परिणाम महिलांमध्ये स्त्री बीज निर्माण होण्यामध्ये अडथळा येतो. यामुळे स्त्रियांच्या संपूर्ण शरीराच्या कार्य मध्ये परिणाम होतो.

तसेच काही स्त्रियांमध्ये पीसीओडी समस्यांमुळे हार्मोन्स संतुलन बिघडते त्यामुळे काही वेळाने स्त्रियांना हार्मोन्समधील असंतुलनामुळे ला सामोरे जावे लागते.

पीसीओडी ची ही समस्या साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींन पासून पन्नास वर्षांच्या महिलांपर्यंत पहायला मिळते.

सध्याच्या काळामध्ये वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक स्त्रियांमध्ये आई नं होण्याचे एकमेव कारण म्हणजे पीसीओडी ची समस्या हेच आहे. अनेक मुली अनियमित मासिक पाळी आल्यास तुरंत वैद्यकीय सल्ला घेतल्यास भविष्यामध्ये त्यांना वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.

आजच्या आधुनिक काळामध्ये वैद्यकीय सल्ला घेतल्यास किंवा आपल्या दैनंदिन जीवनात शैलीमध्ये बदल केल्यास आपण पीसीओडी च्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो.

Pcod ची लक्षणे:

काही महिलांमध्ये पीसीओडी चे समस्या पाहायला मिळते परंतु त्या महिलांना नेमके पीसीओडी म्हणजे काय? किंवा पीसीओडी ची लक्षणे काय याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने अशा महिलांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी चटकन उपचार करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक महिलेला पीसीओडी ची लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही पीसीओडी ची लक्षणे देखील घेऊन आलेत ते पुढील प्रमाणे;

  1. अनियमित मासिक पाळी:

प्रत्येक महिलेला एका विशिष्ट वयोगटांत दर दर महिन्याला गर्भाशयातून एक परिपक्व असलेले बीज बाहेर पडते यालाच मासिक पाळी किंवा ऋतुस्राव असे म्हणतात. मात्र ज्या महिलां मध्ये पीसीओडी ची लक्षणे किंवा पीसीओडी हा आजार असतो त्या महिलांमध्ये पीसीओडी मुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो. त्यामुळेच अशा महिलांमध्ये मासिक पाळी संबंधी विविध समस्या निर्माण होतात. जसे की, मासिक पाळी येण्या मध्ये उशिरा होणे.

  1. वंधत्व:

पीसीओडी महिलांच्या वंध्यत्वाचे प्रमुख कारण बनले आहे. महिलांमध्ये गर्भधारणा होण्यासाठी ओव्हूलेशन होण्याची गरज असते.मात्र ओवूलेशन च्या प्रक्रियेमध्ये अंडाशय मध्ये झालेल्या गाठींमुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच काही महिलांना वंधत्वाचा सामना करावा लागतो.

  1. वजन वाढ:

पीसीओडी च्या समस्यांमुळे काही महिलांमध्ये अचानक वजन वाढ होण्यास सुरुवात होते. अशा महिलांच्या पोटाचा घेर अचानकपणे वाढू लागतो. आजकाल अनेक महिलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे त्यामुळे अचानक पणे वजन वाढ झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

  1. अशक्तपणा:

पीसीओडी च्या समस्यांमुळे महिलां च्या संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. महिलांमधील हार्मोनच्या कार्यामध्ये अडथळा आल्यामुळे महिलांना हार्मोन्स असंतुलन पणाला सामोरे जावे लागते त्यामुळे अशा महिलांमध्ये सतत कंटाळा येणे आणि अशक्तपणा येणे ही लक्षणे दिसून येतात.

Pcod ची कारणे:

महिलांमध्ये पीसीओडी ची समस्या का उद्भवते यामागील कारणे देखील प्रत्येक महिलांना जाणून घेणे आवश्यक आहेत किंवा एखाद्या महिलांमध्ये पीसीओडी ची लक्षणे दिसत असतील तर ती लक्षणे दिसणे मागेच कारणे देखील जाणून घ्यावी त्यामुळे भविष्यात सामोरे जाणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात.

  1. चूकीची जीवनशैली:

आजची जीवनशैली ही खूप वेगाने बदलत आहे. कारण दिवसेंदिवस बदलत चाललेले जीवनशैलीमुळे स्त्रियांमध्ये ताणतणाव, कुटुंबास संबंधीच्या अनेक समस्या त्यामुळे शरीरात हार्मोन्स बदलण्याची शक्यता असते. यामुळेच काही महिलांना पीसीओडी च्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

  1. चुकीचा आहार:

आधुनिक काळाप्रमाणे बदलत याप्रमाणे का आहार देखील बदलला. फास्ट फूड, जंक फूड, पॅक्ड फूड इत्यादींचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे पीसीओडी समस्या उद्भवू शकतात.

  1. अनुवंशिकता:

महिलांच्या आईला अथवा बहिणीला पीसीओडी च्या समस्या असतील तर त्या महिलेला देखील अनुवंशिकथे नुसार पीसीओडी ची समस्या असू शकते.

पीसीओडी पासून दूर राहण्याचे उपाय

पीसीओडी समस्यांपासून दूर राहायचे असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपणास बदल करणे खूप गरजेचे आहे.

  1. नियमित व्यायाम करणे: पीसीओडी या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
  2. संतुलित आहार: पीसीओडि या समस्यांपासून दूर राहायचं असेल तर आपण संतुलित आहार करणे गरजेचे आहे. जंक फूड, फास्ट फूड इत्यादी न खाता संतुलित आणि योग्य आहार करणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो! “Pcod full form in Marathi | पीसीओडी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay