ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान । ओवा बद्दल संपूर्ण माहिती । Ajwain in Marathi

By Information Essay •  1 min read

ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान । ओवा बद्दल संपूर्ण माहिती । Ajwain in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले Information Essay या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान । ओवा बद्दल संपूर्ण माहिती । Ajwain in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान । ओवा बद्दल संपूर्ण माहिती । Ajwain in Marathi

संपूर्ण जगात मसाला म्हणून विविध पदार्थ वापरले जातात. या पदार्थांपासून आपल्या शरीरासाठी एक आरोग्यदायी लाभ होतो. काही मसाले पदार्थ हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. असाच एका मसाल्याच्या पदार्थाची माहिती आम्ही आजच्या पोस्टमध्ये घेऊन आलो ती म्हणजे “Ajwain in Marathi.”

आपल्यातील बहुतेक जणांना Ajwain नणजे काय आणि तो कशाप्रकारे आपल्या जीवनामध्ये फायदेशीर ठरतो हे माहिती नाही. त्यांच्यासाठी आजचे आमचे आर्टिकल खूप फायदेशीर ठरेल.

Ajwain in Marathi :

Ajwain ला मराठीमध्ये ” ओवा “ असे म्हणतात. तर अजवाइन चे शास्त्रीय नाव हे ” Trachyspermum copticum “ असे आहे. आजवाइन ही पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियात उगवणारीएक औषधी वनस्पती आहे.

संपूर्ण जगभरात पाककलाकृती मध्ये खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्याकरिता अजवाइन चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

अजवाइन ही एक औषधी वनस्पती असून आजवाइनचा वास हा उग्र प्रकारचा असल्याने संस्कृतीमध्ये आजवाइनला ” उग्र ग्रंथ” असे म्हणतात.

शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आणि निरोगी असलेली आज वाईन संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

जगभरात ओवा आढळत असला तरी भारत आणि इराण या देशांमध्ये आजवाइनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

पोटान संबंधीच्या आजारासाठी आजवाइन हा एक रामबाण उपाय आहे. अजवाइन च्या बिया, फुले, साली यांचाही वापर औषधांमध्ये केला जातो. शरीरात उदरातील जंतू मारण्यासाठी आजवाइध एक उपयुक्त औषधे समजली जाते. याबरोबरच दातांचे दुखणे,कानातील ठणक, रुदया संबंधित समस्या, वातरोग, नाकातील नसांचे फुगल्या या सर्व आजारांवर आजवाइन गुणकारी औषधी आहे.

तसेच कामकुवता वाढली असेल तर, माणसाला शांत आणि थंड ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.

 ओवा वनस्पती :

अजवाइन वनस्पतींची उंची ही एक ते तीन मीटर एवढी असून ही वनस्पती वर्षायू आहे.

अजवाइन वनस्पती चा खोडावर अनेक फांद्या व अनेकदा विभागलेली पाने असतात. पानाचे अंतिम खोड रेषाकृती असून ते सुमारे 0.5 सेंटीमीटर एवढ्या लांब असते. या वनस्पतीच्या फुले लहान पांढऱ्या रंगाची व चरवी सारख्या आकाराची फुले फुलोऱ्यात येतात.

अजवाइन वनस्पतीला फुले येण्याचा काळ हा एप्रिल महिन्यात दरम्यानचा असतो. अजवाइन वनस्पती ला येणारे फळ बिया या उभाट, शिराल व बारिक असून बाजारांमध्ये या ओवा म्हणून विकल्या जातात.

 ओवा मध्ये असलेले औषधी गुणधर्म :

Ajwain मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आयुर्वेदामध्ये आणि प्राचीन काळापासून अजवाइन हा एक औषधी गुणधर्म म्हणून वापरला जातो.

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला हा ओवा ( Ajwain ) हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.

Ajwain पाचक तसेच रुचकर असतो. चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व लघू गुणांचा असला तरी यामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत.

ओवा अग्नीला प्रदीप्त करतो, वात तसेच कफदोषाचे शमन करतो. पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म तसेच पोटात जंतू होणे यावर ओवा गुणकारी आहे.

मात्र ओव्याचे सेवन अति झाल्याने त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. पित्त वाढणे, शुक्रधातूला कमी करणे अशा समस्या उद्भवू शकतात त्यामुळे ओव्याचे सेवन हे नेहमी खाद्यपदार्थांमध्ये मसाला म्हणून करावा.

 ओवा मधील पौष्टिक तत्व :

आजवाइन मध्ये औषधी गुणधर्म असले तरी यामध्ये विविध पौष्टिक तत्व असतात ते पुढीलप्रमाणे,

प्रत्येकी 100 ग्राम फाईल मध्ये पुढील प्रमाणे पोस्टीक तत्वे असतात.

25 ग्राम फॅट असतात, चार ग्राम सॅच्युरेटेड फॅट, 29 ग्रॅम फायबर, 43 ग्राम कार्बोहायड्रेट, 10 ग्रॅम सोडियम, 16 ग्रॅम प्रोटीन इत्यादी पौष्टिक तत्व मुबलक प्रमाणात असतात.

 ओवा चे‌ आयुर्वेदिक फायदे :

ओव्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा अनन्यसाधारण स्थान दिलेले आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक पद्धतीने ओवा आरोग्यासाठी हितकारक असल्याचे सांगितले आहे.

ओव्याचे काही महत्त्वाचे फायदे आहे तर ते पुढील प्रमाणे,

  1. सर्दी वर लाभदायक :

अजवाइन मुळे सर्दीमुळे बंद झालेले नाक तुरंत बरे होते. छाती मध्ये झालेला कफ बरे करण्यासाठी सुद्धा ओवा लाभदायक ठरतो.

  1. अपचन आम्लीयता पासून आराम :

आजवाईन मध्ये असलेले डायजेस्टिव्ह एंजाइम जेवण पचन करण्यास मदत करतात. त्यामुळे जड झालेले पोट हलके होण्यास सुद्धा मदत होते.

जीरा आणि ओवा दोन्ही सममात्रेमध्ये घेऊन त्यांचा रस पिल्यास ऍसिडिटी पासून आराम मिळतो.

  1. केस पांढरे होण्यापासून बचाव :

कमी वयामध्ये होणारे पांढरे केस थांबवण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो.

कडी पत्ता, सुकलेली द्राक्षे, साखर आणि ओवा यांचे मिश्रण करून रोज पिल्यास केस लवकर पांढरे होत नाहीत.

  1. संधिवातासाठी लाभदायक :

ओव्यामध्ये संधीवातावर मात करण्याची ताकत आहे. रोज एक चमचा ओवा खाल्ल्याने संधिवातामध्ये होणारे दुखणे व जोड्यांमध्ये होणारे सूज कमी होते.

  1. रक्तदाब सुरळीत ठेवणे :

अजवाइन मध्ये थायमोल असते जे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो.

ओवा कॅल्शियमला हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करण्यापासून थांबवतो ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

  1. दाढ दुखण्यावर उपाय :

दाढ दुखणे हा जवळजवळ सर्वांना होणारा एक आजार आहे. त्यावर घरगुती उपाय म्हणजे सोमल पाण्यात भिजवलेला ओवा व चिमूटभर मीठ घालून गुळण्या केल्याने दाढ दुखणे त्वरित थांबते.

  1. वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो :

लठ्ठपणा किंवा वजन कमी करणे  त्यासाठी ओवा खूप फायदेशीर आहे. गोवा शरीरातील मेटाबोलिजम वाढवते व पचनसंस्था सुरळीत चालू ठेवते. त्यामुळे शेतातील फॅटचे प्रमाण कमी होते व वजन कमी होण्यास व लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

  1. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते :

आजवाइन मध्ये मोठ्या प्रमाणात साठी असिड व फायबर यांचे प्रमाण असते, जय चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून खराब  कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरते.

 ओवा चे इतर फायदे :

वरील सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदानुसार अजवाइन चे विविध फायदे आहेत. तसेच त्यांना सोडून आजवाइनचे इतरही काही ‌फायदे आहेत व ते पुढील प्रमाणे,

  1. Ajwain पचनशक्ती वाढवण्यास मदत करते.
  2. जिवाणूंचा संसर्ग कमी करण्यासाठी मदत करते.
  3. पित्ता वरील घरगुती उपाय म्हणून Ajwain वापरली जाते.
  4. त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी अजवाइन फायदेशीर ठरते.
  5. सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय म्हणजे अजवाइन आहे.
  6. उन्हाळी लागल्यास ओवा खाल्ल्याने आराम मिळतो.
  7. संधीवातावर उपाय म्हणून अजवाइन वापरली जाते.

 ओवा खाण्याचे नुकसान :

साधारणता आजवाईनचे सेवन हे  मध्यम प्रमाणात केल्यास कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत परंतु अजवाइन चा वापर हा गरजेपेक्षा जास्त किंवा जास्त प्रमाणात केल्यास काही लोकांमध्ये त्याचे प्रतिकूल परिणाम दिसून येतात.

अजवाइन चे सेवन जास्त केल्यास अतिसार, यकृत रोग, डायव्हर्टिकुलाइटिज  आणि अल्सरेटिव्ह कोलायटीस ग्रस्त लोकांनी अजवाइन चे सेवन टाळले पाहिजे.

तर मित्रांनो ! “ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान । ओवा बद्दल संपूर्ण माहिती । Ajwain in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा

” ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान । ओवा बद्दल संपूर्ण माहिती । Ajwain in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

Information Essay