नागपंचमी माहिती मराठी मध्ये । Nag Panchami Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Nag panchami Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले Information Essay वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

 आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” नागपंचमी माहिती मराठी मध्ये । Nag panchami Information in Marathi “ घेऊन आलोत.

 आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर हे सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

नागपंचमी माहिती मराठी मध्ये । Nagpanchami Information in Marathi
Nag Panchami Information in Marathi

नागपंचमी माहिती मराठी मध्ये । Nag Panchami Information in Marathi

 हिंदी संस्कृती मध्ये अनेक सण साजरे केले जातात या   सर्व सणांमध्ये नागपंचमी   हा एक सण आहे.  आपल्या हिंदू धर्मामध्ये नागाला देवता म्हणून पूजले जाते. हिंदू धर्मातील देव महादेव यांच्या गळ्यामध्ये नाग असल्याचे दिसते. त्यामुळे नागोबाला नाग देवता असे म्हणतात.

 तसेच, आपल्या देशामध्ये नागोबाचे आणि का मंदिरे पहायला भेटतात ज्या ठिकाणी भाविक भक्तिभावाने जाऊन नागाची पूजा करतात. विशेषता नागपंचमी  या दिवशी संपूर्ण देशभरात नागाची पूजा केली जाते.

नागपंचमी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात व पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते नागाचा आशीर्वाद घेतला जातो.

  नागपंचमी सण केव्हा येतो When does Nag Panchami come :

 हिंदू धर्मातील एक प्राचीन सण म्हणून सुद्धा नागपंचमी या सणाला ओळखतात. नागपंचमी या सणा दिवशी नागदेवता ची पूजा केली जाते. नागपंचमी हा दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी येतो.

 या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.

 दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी संगमावर स्नान  करतात.

नागपंचमी हा सण का साजरा करतात Why do people celebrate Nag Panchami ?

  असे म्हणतात की,भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा  पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. भगवान श्रीकृष्णाने कालिया  नागाचा वध केला तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस होता.  त्या दिवसापासून नाग पूजा करण्याची प्रथा चालत आली असे म्हटले जाते.

Nag Panchami Information in Marathi

 नागपंचमी हा सण कसा साजरा केला जातो How Nag Panchami is celebrated ? :

 नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी  दूध पाजतात.

 अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया यात नऊ नागांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी हा सण आहे.

 नागपंचमी या सणाची प्रथा फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे ,व आधुनिक काळात सुद्धा पाळली जाते.

 नागपंचमी या दिवशी मुक्तता स्त्रिया नागांचे पूजा करतात. ग्रामीण भागामध्ये नागाचे घर म्हणजे  वारूळ  या ठिकाणी जाऊन नागाला दुधाचा आणि लाह्यांचा प्रसाद देतात व नागाची पूजा करतात. व वारुळाच्या शेजारी महिला गाणे म्हणतात.

 तर शहरी भागातील स्त्रिया या नागाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजा करतात. नागाला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. नागोबा चे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये  जाऊन  नागोबाची पूजा करतात.

 नागपंचमी या दिवशी सर्प कृत भाज्या भक्षण न करण्याची प्रथा आहे.

 तसेच नागपंचमी या दिवशी सूरी, चाकू, तवा, विळी या साधनांचा वापर केला जात नाही. त्यादिवशी अन्न फक्त शिजवून खाल्ले जाते.

 तसेच नागपंचमी या दिवशी शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरणे खाणणे अशा प्रकारची कुठलीही कामे करत नाहीत.

 या दिवशी  सर्व स्त्रिया घराची स्वच्छता करतात. अंगणात रांगोळी काढतात. भिंतीवर नागाचे चित्र काढतात किंवा फोटोची पूजा करतात.

 भारताच्या काही भागांमध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते. व त्यांना दूध आणि लाह्यांचा प्रसाद दाखवला जातो.

महिलांचा सण- नागपंचमी Women’s festival- Nag Panchami :   

विशेषता नागपंचमी हा सण हा महिलांचा सांग म्हणून ओळखले जाते.

 कारण या  सणाला नवविवाहित असते या त्यांच्या माहेरी  जाण्याची प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया झाडाला झोका बांधून झोके घेण्याची प्रथा आहे. या दिवशी स्त्रियांनी पाच तरी झोप खेळावे असे म्हणतात.

  नागपंचमीच्या पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धती हा हौंसेचा भाग आहे.

 पूर्वी नागपंचमीच्या सनापूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर पासूनच गल्लीतील सर्व स्त्रिया एकत्र येऊन विविध खेळ खेळायच्या,फेर धरायचा आणि गाणी म्हणायचा.

 झिम्मा, फुगडी, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या.

 त्यामुळे नागपंचमी सणाला महिलांचा असे सुद्धा म्हटले जाते.

 नागपंचमी सणाच्या कथा Stories of Nag Panchami festival :

 प्रत्येक सणामागे काही ना काही  आख्यायिका आणि कथा आसतात त्या प्रमाणे नागपंचमी या सणामागे ही प्राचीन कथा आहेत.

 श्रीकृष्णाने कालिया नागाचा वध केला, त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा करण्याची प्रथा चालत आलेली आहे.

 एका प्राचीन कथेनुसार, फार पूर्वी परीक्षित नावाचा एक राजा होता. या राजाला शिकार करण्याची फार आवड होती असेच शिकार करण्यासाठी तो एकदाच जंगलामध्ये गेला. जंगला मध्ये फिरत असताना त्याला खूप जोराची तहान लागली. जंगलामध्ये इकडे तिकडे फिरत असताना तेथे त्याला एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीच्या शेजारीच एका आश्रम होते, ते आश्रम एका ऋषींचे होते.

 या आश्रमातील ऋषी घोर तपश्चर्या करण्यामध्ये मग्न होते. त्याच वेळेस राजाने तिथे  जाऊन ऋषींना पाणी मागितले.

 मात्र  तपश्चर्या मध्ये मग्न असलेल्या ऋषीनी राज्याकडे लक्ष दिले नाही. ह्यामुळे राजाला अतिशय राग आला.

 रागा मध्ये येऊन राजाने मेलेला साप ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. हे सर्व  ऋषीच्या पुत्राने बघितले, व त्याने क्रोधित होऊन राजाला शाप दिला,” हे राजा तुला आज पासून सातव्या दिवशी दक्षक नावाच्या सापा कडून सर्पदंश होइल  व त्यामुळे तुझा मृत्यू सुद्धा होईल.”

 या शापामुळे राजा खूप घाबरला, व त्याने घडलेली सर्व हकीकत घरी येऊन राजवाड्यातील सर्वांना सांगितली. राजाला एक मुलगा होता या मुलाने आपल्या वडिलांना वाचण्यासाठी एक मोठ्या यज्ञाचे आयोजन केले.

 यज्ञ सुरू झाल्यानंतर, यज्ञाच्या ठिकाणी सर्व साप येऊ लागले आणि स्वतःला त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये  झोकून देऊ लागले.

 त्यानंतर सर्व नाग अस्तिक ऋषींच्या शरण जाऊ लागले, आस्तिकऋषींनी राजा च्या मुलाला सर्व हकीकत सांगितली.

 आपल्या वडिलांच्या तर्फे राजाच्या मुलाने अस्तिक ऋषींची अशा मागितली. त्या दिवसापासून नागाची पूजा करण्याचा निश्चय केला. या दिवसापासूनच नागपंचमी श्रावण महिन्यातील शुभ दिवस म्हणून साजरा केली जाते.

  नागपंचमीचे सांस्कृतिक महत्त्व Cultural Importance of Nag Panchami :  

अनेक पुराणावरून, आणि प्राचीन कथा अरुणा असे कळून येते की , नागाला खूप प्राचीन काळापासूनच आपल्या संस्कृती मध्ये देव मानले जाते.

 भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फर्नधारी साप. नागाच्या फण्यावर पुढच्या बाजूला दहा अंका सारखे चिन्ह असते. नागाच्या तोंडात विधान करणारे दात असतात. भारतीय लोक नागाला देव समजून त्याची पूजा करतात.

  नागपंचमी सणाचे पूजेचे स्वरूप Nature of Nag Panchami festival worship :

 नागपंचमी या सणाच्या दिवशी महिना घर स्वच्छ करतात व अंगणामध्ये रांगोळी टाकतात . नागाचे चित्र भिंतीवर काढतात व त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळाची पूजा केली जाते. उत्तर भारतातील काही भागांमध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते.

 नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. नागा पासून आपल्या घराचे रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करतात.

  आधुनिक काळातील नागपंचमी Nag Panchami in modern times :

 अलीकडील आधुनिक काळात नागपंचमी सणा च्या नावाखाली लोक टोपलीमध्ये नाग पकडून आणतात.  व लोकांकडून पैसे ,धान्य अशा वस्तूंची मागणी करतात. नागांचे दात काढून, त्यांना उपाशी टोपलीत झाकून ठेवणे अशाप्रकारे अलीकडे नागांचा छळ होत आहे.

 नागपंचमी हा सण आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे मागायचा असा छळ न करता, शाळा ,महाविद्यालय, मध्ये जाऊन साप, नागांची उपयुक्तता केली पाहिजे.

 पिकांची नासधूस विकणारे उंदीर, यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर शेतातील नागांना मारता त्यांना शेतातच राहू दिले पाहिजे.

 आपल्याकडे भीती आहे की नाग चावल्याने मनुष्य  मरतो.  परंतु नागाला कोणी तरी डवचले  तेव्हाच नाग  दंश करतो अथवा नाग कोणालाही चालत नाही.

 त्यामुळे  नागाला देवता समजून त्याची पूजा करणे हे आपल्या आलीकडे संस्कृतीसाठी फायदेशीर ठरेल.

 तर मित्रांनो ! ” Nag Panchami Information in Marathi ”  वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” Nag Panchami Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

हे सुद्धा अवश्य वाचा :

 धन्यवाद!

Information Essay