MPSC Exam Information in Marathi

By Information Essay •  1 min read

नमस्कार मित्रांनो! आपले……..या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे .या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारची माहिती वाचायाला माहिती वाचायला मिळाले.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही “MPSC Exam Information in Marathi” घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मित्रांनो! तुमच्यापैकी कोणी एमपीएससी(MPSC) परीक्षा देण्याची तयारी करत असेल किंवा एमपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा असेल व त्यांना एमपीएससी म्हणजे काय? त्याच्या साठी कुठला अभ्यास करावा लागतो? एमपीएससी परीक्षा मधून कुठली पदे मिळतात ?

याची माहिती नसेल,त्यांच्यासाठी आजचे आमचे हे आर्टिकल खूप फायदेशीर ठरेल. “MPSC Exam Information in Marathi”   यामध्ये आम्ही एमपीएससी बद्दल ची सर्व माहिती घेऊन आलोत आणि एमपीएससी परीक्षा देणाऱ्या करिता विद्यार्थ्यांना कुठल्या परीक्षेतून जावे लागते याची ही माहिती आजच्या या आर्टिकल मध्ये मिळेल.

भारतामध्ये विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात त्यातील युपीएससी(upsc) ही परीक्षा सर्वोच्च पदाची परीक्षा समजली जाते. त्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्यात सुद्धा सर्वोच्च पदासाठी एमपीएससी(MPSC) परीक्षा घेतली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग.  हे महाराष्ट्र शासनाच्या आदेशा खाली यांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचे काम करते.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.

या आयोगातून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार ,पोलीस उपाधीक्षक, मुख्य अधिकारी, गट विकास अधिकारी अशा पदांची निवड केली जाते

एमपीसी (MPSC)म्हणजे काय?

एमपीएससी (MPSC)चा अर्थ महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन (Maharashtra Public Service Comission) म्हणजेच “महाराष्ट्र लोकसेवा आयोग.”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा भारताच्या संविधानाच्या कलम 315 अन्वये नुसार तयार करण्यात आला आहे.

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे कलम 320 अन्वये नुसार सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम पार पाडते.

तसेच प्रशासनात पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती करताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी घटनाकारत्यांनी राज्य घटनेत स्पष्ट नमूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी ,उमेदवारांची निवड करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी ही घटनात्मक संस्थेकडे सोपवली आहे.

*एमपीएससी (MPSC)परीक्षा देण्या करिता पात्रता किती असावी?

एमपीएससी(MPSC)परीक्षा ही महाराष्ट्र राज्याकडून घेतली जाणारी एक स्पर्धा परीक्षा आहे.

एमपीएससीची परीक्षा देण्याकरिता 19 वर्षे पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार महाराष्ट्र राज्याची “राज्यसेवा परीक्षा” देऊ शकतो.

परंतु,खुल्या गटातील उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा आहे ती म्हणजे खुल्या गटातील उमेदवार हा 19 ते 38 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. तर राखीव गटातील उमेदवार हा वयाच्या 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो.

एमपीएससी परीक्षा वयोमर्यादाच्या या कालावधीमध्ये कितीही वेळा देता येते.

एमपीएससी परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या रहिवाशाचे किंवा आदिवासा( डोमिसाईल प्रमाणपत्र)प्रमाण पत्र मिळवाव लागत.

राज्यसेवा परीक्षा हे मराठी आणि इंग्रजी भाषेत देता आली तरी, मराठी विषयाचे ज्ञान असणे हे गरजेचे आहे. त्यासोबतच शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी विषय असणे हे बंधनकारक आहे.

वरील सर्व पात्रता उमेदवारात असल्यास एमपीएससीची परीक्षा देता येते.

*राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप:

महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा साठी लागणारी पात्रता ही आपण वर बघितले आहे आत्ता राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप बघणार आहोत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध प्रशासकीय विभागात वर्ग-३ पासून ते वर्ग-१ पर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांची भरती केली जाते. विविध प्रशासकीय पदांसाठी राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते. या आयोगाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, राज्यसेवा परीक्षा,पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, मंत्रालयीन सहाय्यक, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र न्यायालयीन सेवा परीक्षा, मोटार वाहन निरीक्षक परीक्षा इत्यादी पदांच्या सेवेसाठी सरळ सामान्य राज्य सेवा चाचणी परीक्षा घेतली. जाते व परीक्ष्यातून त्या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवडणूक केली जाते. ही परीक्षा प्रशासकीय सेवेतील विभागांतर्गत घेतली जाते.

आयोगाच्या वतीने राज्यसेवा अधिकाऱ्याच्या परीक्षा देण्याकरिता, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यातून जावे लागते. या तिन्ही परीक्षा जो उमेदवार योग्य रीतीने पार करतो, त्याला राज्यसेवेच्या अधिकाराचे पद दिले जाते. राज्यसेवा परीक्षेतून राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक राजपत्रित गट-अ व गट-ब पुढील पदे हे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार भरण्यात येतात.

*राज्यसेवेतील पदे:

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सेवा या स्पर्धा परीक्षेतून विविध पदांची भरती केली जाते. त्यातील काही मुख्य पदांन बद्दल माहिती आपण बघणार आहोत.

1.उपजिल्हाधिकारी:  उपजिल्हा अधिकारी राज्य सेवेतील सर्वात उच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा पद्धतीने या पदासाठी निवडणुका होतात. या पदावर काम करणाऱ्या उमेदवाराच्या दहा ते पंधरा वर्षाच्या सेवा नंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढती द्वारे प्रवेश मिळू शकतो. या पदासाठी उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी इत्यादी पदांची नेमणुका केल्या जातात.

* उपविभागीय अधिकारी: उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना एखाद्या उमेदवाराला  त्याच्या उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे महसूल वेळेवर गोळा करणे, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य करणे. इत्यादी कामे एक उपविभागीय अधिकारी म्हणून करावे लागतात.

* विविध खात्यांची उपजिल्हाधिकारी: विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना एखाद्या उमेदवाराला त्या खात्याशी संबंधित सर्व कार्यवाही पूर्ण करणे, माहिती अद्यावत ठेवणे इत्यादी कामे करावी लागतात.

* निवासी उपजिल्हाधिकारी:  निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना एखादा उमेदवाराला वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे, व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थित जिल्ह्याचे सर्व सूत्रे पाहणे इत्यादी कामे करावी लागतात.

  1. तहसीलदार:

तहसीलदाराच्या पदासाठी राज्यसेवा परीक्षा एमपीएससी द्यावी लागते. प्रत्येक तालुक्यासाठी राज्य सरकार एक तहसीलदाराने मत असतो त्यासाठी एमपीएससी परीक्षा द्यावी लागते.

तहसीलदार या पदावर काम करणाऱ्या उमेदवारास तालुक्यातील महसूल वसुली आणि प्रशासन या संबंधित सर्व कामे करावी लागतात.

तसेच तालुका दंडाधिकारी आणि सुव्यवस्थित व शांततापूर्वक राखण्याचा अधिकार हा तहसीलदार कडे असतो. आपत्ती व्यवस्थापन ,नुकसान भरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी इत्यादी कामे एक तहसीलदार म्हणून करावे लागतात.

  1. नायब तहसीलदार:. महाराष्ट्र जमीन कायद्यानुसार, राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा अधिक नायाब तहसीलदाराची निवडणूक करतात.

तहसीलदार पातळीवर घेतलेल्या नियमांची अंमलबजावणी नायब तहसीलदाराला करावी लागते. महसूल गोळा करणे,जातीचे दाखले,रहिवासी दाखले जनतेला देणे इत्यादी कामे नायब तहसीलदार करतो.

  1. महाराष्ट्र पोलीस सेवा: महाराष्ट्र पोलीस सेवा हे राज्य सेवेतील सर्वोच्च निवडीचे पद आहे. महाराष्ट्र पोलीस सेवा अधिकारी म्हणून एखादा उमेदवारास गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे, अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, शांतता व सुव्यवस्था राखणे इत्यादी कामे करावी लागतात.
  2. मोटार वाहन विभाग: मोटार वाहन विभाग हा गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. देवा परीक्षेतून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब या पदासाठी मोटार वाहन विभागाची निवड केली जाते.

ड्रायव्हिंग चे पक्के लायसन्स, वाहनांची नोंदणी, हस्तांतरण, तसेच एखादे वाहन बाहेरच्या प्रदेशात किंवा राज्यात गेले असता त्या वाहनाचे “ना हरकत प्रमाणपत्र” तपासणे इत्यादी कामे मोटार वाहन विभागाच्या खाली येतात.

  1. विक्रीकर (व्हॅट)विभाग: विक्रीकर विभाग हा राज्य शासनाचा सर्वात मोठा कर विभाग समजला जातो.

व्यापार्‍यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला किंवा मार्गदर्शन करणे, कराची वसुली इत्यादी बाबी विक्रीकर विभागाकडे येतात.

अशा प्रकारच्या विविध पदांसाठी एमपीएससीची परीक्षा द्यावी लागते.

*एमपीएससी परीक्षेची थोडक्यात माहिती:

एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यातून जावे लागते.

1.पूर्व परीक्षा:  एमपीएससी परीक्षा देण्याचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे हा पूर्व परीक्षेचा असतो. पूर्व परीक्षा ही चारशे गुणांची असते. तर या पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर असतात प्रत्येकी पेपर हा दोनशे मार्काचा असतो. तर प्रत्येक पेपरला दोन तासांची वेळ असते.

पेपर 1: एमपीएससी परीक्षेच्या पूर्व परीक्षेतील पेपर वन हा सामान्य अध्यायांचा असतो.  या पेपरसाठी 2 तासांची वेळ असते तर हा पेपर 200 गुणांचा असतो. पेपर मध्ये चालू घडामोडी,आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, भारताचा संघर्ष लढा, महाराष्ट्राचा विकास, भारताचे संविधान, अर्थशास्त्र व सामाजिक विकास, पर्यावरण परिसंस्था, जैवविविधता आणि सामान्य विज्ञान या सर्व विषयांवर एमपीएससीच्या पूर्व परीक्षा पेपर 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.

पेपर 2:  एमपीएससीच्या पूर्व परीक्षा मध्ये पेपर 2 हा 200 गुणांचा असतो तर या पेपर करिता दोन तासाची वेळ असते. या पेपरमध्ये मुख्यता तर्कशक्ती, सामान्य बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता ,अंकगणिती, मराठी आणि इंग्रजी मधील सुसंवाद कौशल्य पाणी व्याकरण या संबंधित प्रश्न विचारले जातात.

  1. मुख्य परीक्षा: पूर्व परीक्षा झाल्यानंतर चा दुसरा टप्पा हा मुख्य परीक्षेचा असतो. परीक्षेत विद्यार्थ्यांचे खरी कुवत कळून येते.  ही परीक्षा 800 गुणांची असून यामध्ये एकूण चार पेपर होतात.

प्रत्येकी पेपरला दीडशे गुण असतात. यामध्ये  आधुनिक भारताचा इतिहास, इतिहास, भूगोल, भारतीय संविधानाचा प्राथमिक अभ्यास, मानवी संसाधन आणि मानवी हक्क, भारतीय राजकारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान  या सर्व गोष्टींवर प्रश्न विचारले जातात.

हे सोडुन मराठी आणि  इंग्रजी या प्रत्येकी विषयावर शंभर गुणांचा पेपर असतो. व्याकरण, निबंध लेखन, उतारा प्रश्न विचारले जातात.

  1. मुलाखत: एमपीएससी परीक्षेचा अंतिम टप्पा हा मुलाखतीने पूर्ण होतो.

अंतिम निवडीसाठी 100 गुणांची  मुलाखत पार पाडावी लागते. या मुलाखत मुलाखती मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र शासनाचा तर्फे शासकीय पद देण्यात येते.

* निष्कर्ष:

अशा प्रकारे वरील सर्व  टप्पे ने एमपीएससीची परीक्षा  देणे अनिवार्य आहे.

सुरुवातीला पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत  या तीन टप्प्यातून ना टप्प्यातून एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जावे लागते.

तर मित्रांनो! “MPSC Exam Information in Marathi”   वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व व त्यांना आवश्यक शेअर करा.

“MPSC Exam Information in Marathi”  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील  तर ,कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद!

 

Information Essay