महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती मराठी । Mahashivratri Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Mahashivratri Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले Information Essay या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे.या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती मराठी | Mahashivratri Information in Marathi “ घेऊन आलेत.

आम्हाला खात्री आहे की,या वेबसाईटवरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती मराठी Mahashivratri Information in Marathi

भारतात वर्षभरात किती तरी सण साजरे केले जातात. प्रत्येक जण साजरा करण्यामध्ये मागे काही ना काही पौराणिक कथा लपलेल्या असतात. हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराला खूप खूप महत्त्वाचे स्थान आहे.

हिंदू धर्मातील बहुतेक लोक हे भगवान शिव शंकराची भक्त आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला  खूप महत्त्वाचे स्थान आहे.

Mahashivratri Information in Marathi

प्रत्येक महिन्याचा चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस ओळखला जातो. अशा प्रकारे वर्षभरात बारा शिवरात्री येतात. परंतु या बारा शिवरात्री पैकी फेब्रुवारी -मार्च महिन्यामध्ये येणारे शिवरात्र ही ” महाशिवरात्र “ म्हणून साजरी केली जाते.

महाशिवरात्रीला अध्यात्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे, कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धा ची स्थिती अशी असते की त्यामुळे मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक होण्याची शक्यता असते.

महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. त्यामुळे महाशिवरात्रि रात्री सर्वजण जागरण करून महाशिवरात्रीच्या सण साजरा करतात.

नैसर्गिक ऊर्जेच्या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर उत्सव करून सगळेजण जागे राहतात, आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर न झोपता जागे राहतात.

महाशिवरात्रि म्हणजे काय What is Mahashivratri :

” महाशिवरात्र “ म्हणजेच, ” शिवची महान अशी रात्र. ” महाशिवरात्री हा हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहे संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो.

 या दिवशी शिवशंकराला 108 बेल वाहून शिव नामावली उच्चारली जाते. तसेच महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल शंकराला वाहिले जाते.

Mahashivratri Information in Marathi

 अशाप्रकारे भगवान शंकर यांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र होय.

महाशिवरात्र कधी येते When does Mahashivaratra come? :

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. परंतु माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला जे शिवरात्र येते तिला महाशिवरात्री असे म्हणतात.महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती मराठी ।

इंग्रजी महिन्यानुसार महाशिवरात्रि मुखता फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान येते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिव ची की पूजा अर्चना करून दुसर्‍या दिवशी उपवास संपवतात.

काही मंदिरांमध्ये भजन कीर्तन करून रात्रभर जागरण करतात.

अशा प्रकारे संपूर्ण भारतात महाशिवरात्री साजरी केली जाते.

 महाशिवरात्रीच्या पौराणिक कथा Mythical of Mahashivaratri :

प्रत्येक सण वा उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही पौराणिक कथा या असतातच, त्याप्रमाणेच महाशिवरात्रि सण साजरा करण्यामागे दोन पौराणिक कथा आहेत.

पहिल्या कथेनुसार, ज्यावेळी सागर मंथन झाले त्या वेळी संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. विश्वाची निर्मिती होत असताना समुद्रातून हलाहल विष देखील बाहेर आले.

या हलाहल विष्या मध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करण्याची शक्ती होती. कष्ट करण्याची ताकद केवळ भगवान शिवशंकर आणि मध्ये होती. त्यामुळे भगवान श्रीशंकर आणि हलाहल विषयाला प्राशन करून संपूर्ण ब्रह्मांडाला वाचवले.

परंतु विष प्राशन केल्याने शिव शंकराचा कंठ निळा झाला, व त्यांचा संपूर्ण देह दहा करत होता.

या वेळी एका वैद्याने भगवान शिवाला संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितले. त्यावेळी सर्व देवांनी मिळून भगवान शिवशंकर जागे‌ ठेवण्यासाठी नृत्याची आणि गायनाची व्यवस्था केली.

विष पिल्याने संपूर्ण शरीरात दाह होत असल्याने भगवान शिवानी या दिवशी तांडव नृत्य केले.

अशा प्रकारे भगवान शंकर संपूर्ण सृष्टीला वाचवले म्हणून या दिवशी महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जातो.

महाशिवरात्री दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात आणि रात्रभर भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र ,भजन ,कीर्तन ,गायन अशा कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण रात्रभर जागरण करतात.

दुसऱ्या कथेनुसार, एक शिकारी होता,तो रोज शिकार करून आपल्या पूर्ण कुटुंबाचे पालन करीत होता. एके दिवशी तो शिकार करण्यासाठी निघाला. संपूर्ण दिवस तो शिकार करण्यासाठी जंगलात फिरू लागला परंतु त्याला एकही शिका न मिळाल्याने त्याने रात्रीच्या अंधारात शिकार करण्याचे ठरवले.

व तो एका झाडावर चढून बसला ते झाड होते बेलाचे, या झाडाच्या खाली महादेवाची पिंड सुद्धा होती. शिकार नीट दिसावे म्हणून तो बेलाच्या झाडाचे एक एक पान तोडून खाली टाकत होता, नकळत ते पान महादेवाच्या पिंडीवर जाऊन पडत होते.

Mahashivratri Information in Marathi

पहाटेच्या वेळी तिथे एक हरिण आले, शिकारी ने त्या हरणावर नेम धरला. शिकारी बाण सोडणारच होता तोवर ते हारीण म्हणाले,” हे पारध्या तु बाण सोडणार आणि माझी शिकार करणार हे अटळच आहे, परंतु मी तुला विनंती करतो तू माझी शिकार करण्याच्या अगोदर मला एकदा माझ्या संपूर्ण कुटुंबाला भेटू दे, माझी सर्व कर्तव्य मला पार पाडून येऊ दे.”

हरणाने त्य शिकाऱ्याला वचन दिल्याने, शिकारनी त्याची विनंती मान्य केली. थोड्यावेळाने शिकाऱ्याच्या समोर हरणाचा संपूर्ण परिवार येऊन थांबला व प्रत्येक जण म्हणू लागला,” मला मार पण इतरांना सोडून दे.” हे पाहून शिकाऱ्याला आश्चर्य झाले.

त्यानंतर शिकाऱ्याने पूर्ण कुटुंबाला सोडून दि,ले व तेव्हापासून शिकार करण्याचेही सोडून दिले.

शिकाऱ्याची ची रात्री उपवास घडला व त्याच्याकडून शिवलिंगाची पूजा झाली. त्यामुळे शिकारी पावन झाला.

अशाप्रकारे महाशिवरात्रीच्या पुराणांमध्ये कथा आहेत.

महाशिवरात्रीचे महत्व Importance of Mahashivaratri :

भगवान शिवशंकराने विष पिऊन संपूर्ण विश्वाची रक्षा केली. त्यामुळे महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जातो.

तर काही कथेनुसार असे कळून येते की, महाशिवरात्री या दिवशी शिव शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. म्हणून महाशिवरात्र साजरी केली जाते. त्यामुळे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे .

महादेवानी या दिवशी तांडव नृत्य केले होते. महादेवांना शांत करण्यासाठी व भुलोकाचा विनाश टाळण्यासाठी सर्व लोकांनी भगवान शिव शंकरा कडे प्रार्थना केली होती.

Mahashivratri Information in Marathi

महाशिवरात्री मागच्या कथा सोडून, महाशिवरात्रीला अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे. योगिक परंपरांमध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे. या रात्री ग्रह उत्तर गोलार्धात अशा प्रकारे स्थित होतात की , मानवी ऊर्जा नैसर्गिकरीत्या वरच्या दिशेला सरकते.

महाशिवरात्रि हा दिवस असा आहे की त्यादिवशी निसर्ग मनुष्याला अध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यास मदत करतो. त्यामुळे महाशिवरात्रीच्या रात्री सर्वजण रात्रभर जागरण करतात.

त्यामुळे महाशिवरात्रीला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

 महाशिवरात्रीची पूजा पद्धती Process of Mahashivratri Pooja :

महाशिवरात्रीला दूध, दही, तूप शेण आणि गोमूत्र असे न पंचगव्य वापरून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही ,तूप,मध आणि साखर हे पंचामृत वापरून शिवलिंगाला लेप देतात.

त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने वापरून शिवलिंगाची पूजा करतात.

महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आवश्यक असलेली सामग्री म्हणजे, शिव शंकराची मूर्ती, रुद्राक्ष, बेलाची पाने ,धोत्र्याची फुले, पांढऱ्या फुलांचा हार इत्यादी गोष्टी आवश्यक असतात.

महाशिवरात्रीचा उपवास Fasting on Mahashivaratri :

महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात.

अंन्न‌न खाता भक्त फक्त दूध किंवा फळे इत्यादी गोष्टी आहार करतात. दुधापासून बनवलेले पदार्थ भगवान शिव शंकराला नैवेद्य दाखवतात. नंतर तेच पदार्थ ग्रहण करतात.

 तर काही भाविक  महाशिवरात्रीच्या दिवशी  बारा ज्योतिर्लिंगापैकी  जवळ असलेल्या एखादा ज्योतिर्लिंगाला  दर्शन साठी जातात. महाशिवरात्री दिवशी बारा ज्योतिर्लिंगापैकी एकादा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते.

 भारताचे विविध प्रांतातील महाशिवरात्री Mahashivaratri in various States of India :

 दक्षिण भारत: दक्षिण भारतामध्ये महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या ठिकाणी  पहाटे स्नान करून शंकराचे दर्शन घेतात. तसेच भगवान शिवशंकर ला कमळाचे फूल अर्पण करून तांदुळाचे खीर करून नैवेद्य दाखवतात.

तसेच ऋग्वेदातील सुक्तते सुद्धा म्हणतात. तसेच तुळशीची पाने शंकराला अर्पित करतात. त्याप्रमाणेच तीळ घातलेला भात, बेलाची पाने, निळ्या रंगाचे कमल फूल अर्पित करून सामवेदाचे पठण सुद्धा करतात.

 ओडिसा : 

इतर राज्याप्रमाणे उडीसा सुद्धा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. येथील लोक महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवतात आणि शंकराच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतात.

 काश्मीर : 

काश्मीर मध्ये सुद्धा भाविक महाशिवरात्रि चा सण श्रद्धेने साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कश्मीर मध्ये पडणारा बर्फाचा पाऊस हा शुभ आणि पवित्र मानला जातो. मंदिरामध्ये जाऊन भाविक शंकराचे दर्शन घेतात. शंकराला अक्रोड आणि कमळाची फुले अर्पित करतात.

 उत्तर प्रदेश : 

उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा शिवरात्रीचा जल्लोष हा पाहायला मिळतो. उत्तर प्रदेश मध्ये स्थिर असलेले वाटेश्वर या शंकराच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त राजस्थान, मध्यप्रदेश या भागातून भाविक दर्शनासाठी येतात. येताना पाण्याची कावड घेऊन येऊन  शिवा ला अभिषेक  घालतात.

 ईशान्य भारत :

ईशान्य भारतातील आसाम या राज्यातील चक्रेश्वर मंदिर आणि उमानंद मंदिर  या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री दिवशी या मंदिराच्या ठिकाणी यात्रेचे आयोजन सुद्धा होते.

 अशाप्रकारे भारतातील विविध प्रांतात महाशिवरात्रीचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

 तर मित्रांनो! ” महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती मराठी | Mahashivratri Information in Marathi “  वाचून आपणास  आवडली असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती मराठी | Mahashivratri Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले  असेल तर ,कमेंट करून नक्की कळवा.

 धन्यवाद!

Information Essay