होळी सणाची माहिती मराठीत | Information About Holi Festival in Marathi

By Information Essay •  1 min read

Information About Holi Festival in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” होळी सणाची माहिती मराठीत | Information About Holi Festival in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

होळी सणाची माहिती मराठीत | Information About Holi Festival in Marathi
Information About Holi Festival in Marathi

होळी सणाची माहिती मराठीत | Information About Holi Festival in Marathi

प्रस्तावना :

भारत संस्कृती मध्ये अनेक उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात. त्या सणां पैकी बहुतेक जणांचा आवडीचा सण असतो तो म्हणजे ” होळी “.

होळी हा वसंत ऋतू मध्ये व मराठी वर्षाच्या अखेरीस म्हणजे फाल्गुन महिन्यात येतो. भारता मध्ये सर्वत्र होळी सण साजरा केला जातो तसेच होळी सणाला नेपाळी लोकांचा सण असेही म्हणतात. तरी आज आपण होळी या सणावर निबंध बघणार आहोत.

होळी सण केव्हा साजरा केला जातो When Holi is celebrated ? :

मुख्यतः होळी हा सण रंगांचा सण आहे हा सण वसंत ऋतु मध्ये आणि मराठी वर्षाच्या अखेरीस मध्ये फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. इंग्रजी कालगणने नुसार हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणून होळी सणाला ओळखतात. सत्याचा असत्याचा विजय, वाईटावर चांगलेपणा विजय हे या सणाचे प्रतीक आहे. होळी हा २ ते ३ दिवसांचा सण आहे. होळी सणा दिवशी सगळे लोक वादविवाद, द्वेष, राग विसरून होलिका दहन साठी एकत्र येतात.

होळी साठी लागणारी लाकडं, गावातील सर्व लोक मिळून जमा करतात. व सर्व स्त्रिया एकत्र येऊन नैवैद्य, पूजेची सर्व तयारी करतात. यावरून कळते ही होळी हा सण एक सण नसून समाजाला एकत्र करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. होळी च्या पहिल्या दिवशी ” होलिका दहन “ होते आणि दुसऱ्या दिवशी ” रंगपंचमी “ असते. कोणी या दिवसाला ” रंगावली “ असे सुद्धा म्हणतात.

Information About Holi Festival in Marathi

होळी सण हा साजरा करण्यामागील कारणे / पौराणिक कथा Reasons behind celebrating Holi / Mythology :

भारत संस्कृती मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात, ते सण साजरे करण्यामागे काही ना काही काल्पनिक कथा व कारणे असतात. तसेच होळी सण साजरा करण्यामागे ही पौराणिक कथा प्रचलित आहे. असे म्हणतात की,

एक खूप मोठे राज्य होते आणि त्या राज्याच्या राजाचे नाव होते हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू राजा हा खूप घमंडी होता तो स्वतःला अतिशय ताकदवान समजत असे. स्वतःवर असलेल्या अति अहंकारामुळे तो स्वतःलाच देव समानी व देवतांची घृणा करत असे. त्यातला त्यात त्याला देव विष्णू चा अति राग असल्याने कोणी विष्णू चे नाव जरी घेतले तरी त्याला आवडत नसे.

हिरण्यकश्यप राज्याला एक मुलगा होता त्याचे नाव होते प्रल्हाद. राजा आणि त्याच्या मुला मध्ये जरा ही साम्य नव्हते. हिरण्यकश्यपू राजा भगवान विष्णू चा राग करत तर प्रल्हाद हा भगवान विष्णू चा पर भक्त होतो. आणि आपला मुला विष्णूचा भक्त असल्याने राजाला आजीबात आवडत नसे.

तो वेगवेगळ्या प्रकारे, प्रल्हाद ची भक्ती भंग करण्याचा प्रयत्न करी, कधी- कधी तर त्याला भीती सुद्धा दाखवत. पण प्रल्हाद ने न डगमगता भगवान विष्णूची उपासना सोडली नाही तो भगवान विष्णूच्या भक्ती तच लीन असे.

काही केल्याने आपला मुलगा भगवान विष्णूची भक्ती सोडना याला कंटाळून राजा आपल्या बहिणीकडे गेला. राजाच्या बहिणीचे नाव होते होलिका. होलिकेला वरदान मिळाले होते की, ती अग्नीवर विजय प्राप्त करू शकेल. म्हणून राजाने होलिकेला भक्त प्रल्हाद ला घेऊन अग्नीच्या जळत्या चितेवर बसण्यास सांगितले.

भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीतच लीन असल्याने तो होलिकेसोबत चीते वर बसले. आणि थोड्याच वेळात होलीका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान सांगितले होते की ज्यावेळी ती वरदानाचा गैरवापर करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.

म्हणून ती अग्नीत जळून राख झाली पण भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत लीन असल्याने त्यांना काही झाले नाही. अशा प्रकारे असत्यावर सत्याचा विजय झाला. व तेव्हा पासून लोकांनी होळी दहन हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली. आणि आजही आपण मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा करतो.

Information About Holi Festival in Marathi

कसा साजरा करतात होळी सण How to celebrate Holi :

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो. आज होळी हा सण काही जण ग्रुपमध्ये तर काही जण वैयक्तिक रीत्या साजरा करतात. होळीच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन लाकडे आणि गोवऱ्या घेतात आणि एक ठिकाणी विशिष्ट प्रकारी मांडणी करतात. मग त्या होळीच्या कडेने रांगोळी टाकतात. मुख्यतः संध्याकाळच्या वेळेस होळी दहन ची तयारी केली जाते.

बायका होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरण पोळीचा स्वयंपाक करून होळीला नैवेद्य दाखवितात. होळीची पूजा, आरती करून होळीची प्रदिक्षणा घातली जाते. लहान मुले होळी भोवती प्रदिक्षणा घालताना ” होळी रे होळी, पुरणाची पोळी” असे ओरडतात.

होळीच्या दुसऱ्या दिवशी ” रंगपंचमी “ असते. रंगपंचमी मुख्यतः रंगाचा सण आहे. रंगपंचमी खरं तर होळी दहानेच्या राखे पासून खेळतात. पण आजकाल रंगपंचमी हा सण खूप आवडीने खेळला जातो.

नव- नवीन कृत्रिम आणि रासायनिक रंगांचा उपयोग करून संपूर्ण भारतात रंगपंचमी साजरी होते. पुरातन काळातील लोक रंग म्हणून गुलाल, हळद, कुंकू, चंदनाची पावडर वापरत पण आज रंगीबेरंगी रंग, पाण्याचे फुगे वेगवेगळ्या पिचकाऱ्या वापरून रंगपंचमी सण साजरा केला जात आहे.

होळी सणाचे महत्व Importance of Holi :

भारतीय संस्कृती मध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. होळीच्या सणा मधून आपल्याला एक महत्वाची शिकवण मिळते जी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय होतोच. चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टी वर विजय होतो. आजच्या काळात भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या यांसारख्या गोष्टी वाढत आहेत. पण होळीचा हा सण आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा संदेश देऊन जातो.

तसेच होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा साजरा करतात. नवीन झाडे, झाडाला येणाऱ्या पाकळ्या, झुडपे वसंत ऋतुचे आतुरतेने वाट बघत असतात. होळीचा सण आपल्याला एक चांगली शिकवण देते ती म्हणजे अंधार्‍या समयी टिकून राहायचे आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची असते. म्हणजेच जुनी दुःख विसरून येणाऱ्या सुखा साठी प्रयत्न करावे.

होळी सणाची माहिती मराठीत | Information About Holi Festival in Marathi
Information About Holi Festival in Marathi

प्रत्येक दिवसानंतर रात्र येतेच त्या प्रमाणे दुःख नंतर सुख देतेच.

होळीच्या सणाला सर्व समाजातील लोक जात- पात, धर्म विसरून एकत्र येतात. मनातील राग, द्वेष विसरतात व होळीच्या रंगात रंगतात. सर्व मानव जाती एकत्र येते व होळीचा सण साजरा होतो. होळी सणाचे महत्त्व म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, वाईट विचारांचा नाश करून चांगली वृत्ती बाळगणे, चांगले व सत्याच्या मार्गावर चालायला लावणारे विचार अंगी बाळगणे हा महत्व पूर्ण संदेश होळी सणातून आपल्याला मिळतो.

भारतातील विविध प्रांतातील होळी सण Holi festivals in different parts of India :

होळी हा सण भारता मध्ये विशेषत: उत्तर भारता मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणारा एक रंगाचा सण आहे. होळीच्या सणाला विविध नावांनी ओळखले जाते. काही ठिकाणी या उत्सवाला ” होलिका दहन “ किंवा ” होळी पौर्णिमा “ म्हणतात. तर काही ठिकाणी ” हुताशनी महोत्सव “, ” दोलायात्रा “, ” कामदहन “ अशा नावाने होळी सण साजरा होतो.

तर कोकणा मध्ये होळीच्या सणाला ” शिमगो “ म्हणतात. तसेच, देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने होळीच्या सणाला ” सुग्रीष्मक “ असे नाव दिले आहे.

 तर मित्रांनो ! Information About Holi Festival in Marathi वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

होळी सणाची माहिती मराठीत यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असेल तर, कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद मित्रांनो !

Information Essay