गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती । Information About Gokulashtami in Marathi

By Information Essay •  1 min read

Information About Gokulashtami in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती । Information About Gokulashtami in Marathi मराठी मध्ये घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवरील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेतून वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

Information About Gokulashtami in Marathi

गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती । Information About Gokulashtami in Marathi

” गोकुळाष्टमी ” म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी, भगवान कृष्णाचा जन्माचा दिवस म्हणून साजरा केला जाणारा हा सण गोकुळाष्टमी. भारत आणि इतर अनेक देशात गोकुळाष्टमीचा हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

गोकुळाष्टमी हा देशातील महत्त्वपूर्ण हिंदू उत्सव आहे. कृष्ण हे वासुदेव आणि देवकी यांचा मुलगा आहे. हिंदू धर्मामध्ये प्रमुख देवता असल्याचा मान भगवान श्री कृष्णाला आहे.

भारतात गोकुळ मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी या ठिकाणी या सणाला फार महत्त्व आहे.

गोकुळाष्टमी कधी साजरा केली जाते । When is Gokulashtami celebrated ?

गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माचा दिवस याच दिवशी म्हणजेच श्रावण महिन्याच्या वद्य आष्टमी, या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कंस राजाच्या बंदिस्त ठिकाणी भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला, म्हणून या दिवसाला महत्त्व देऊन हा सण साजरा केला जातो.

गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने दरवर्षी साजरा केला जातो. गोकुळाष्टमी ला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी यासारखे कार्यक्रम साजरे करून श्रीकृष्णाची आराधना केली जाते.

भारताप्रमाणेच नेपाळ, बांगलादेश, फिजी अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो.

गोकुळाष्टमी ची इतर नावे । Other names for Gokulashtami :

श्री कृष्णाची नावे जसी गोविंद, बाल गोपाल, कान्हा, गोपाल केशव, माखनचोर, मुरलीधर अशी वेगवेगळी नावे आहेत. त्याप्रमाणेच गोकुळाष्टमीला कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माष्टमी, श्रीकृष्ण जयंती, श्री जयंती, अष्टमी रोहिणी अशी वेगवेगळी नावे आहेत.

गोकुळाष्टमी हा सण भगवान कृष्णाचा जन्म दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. भगवान श्री कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत असा उल्लेख पुराणात आढळतो.

Information About Gokulashtami in Marathi

गोकुळाष्टमी चे महत्व । Importance of Gokulashtami :

भगवान श्री कृष्णाचा जन्म दिवस हा श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीत मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत झाला.

हिंदू धर्मामध्ये भगवान श्री कृष्णाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण भारतात आनंदोत्सव गोकुळाष्टमी म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत करतात व श्री कृष्णाच्या भक्तीत मग्न होऊन श्री कृष्णाची आराधना करतात.

भगवान श्री कृष्ण ने कंसाचा वध केला त्यामुळे कृष्णाला खूप महत्त्व आहे. आणि यामुळे कृष्णाचा जन्म दिवस गोकुळाष्टमीला सुद्धा खूप महत्त्व आहे.

गोकुळाष्टमी ची पौराणिक कथा । Mythology of Gokulashtami :

भगवान श्री कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार म्हणजेच विष्णूने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी श्री कृष्ण म्हणून जन्म घेतला. भगवान श्री कृष्णाच्या जन्माच्या वेळेस एक आकाश वाणी झाली आणि या आकाशवाणी नुसार देवकीचा आठवा पुत्राच्या हातून कंसाचा वध होईल.

कंस हा देवकीचा भाऊ आणि श्री कृष्णाचा मामा. या आकाशवाणी नंतर कंसाने देवकी आणि वासुदेव यांना एक बंदीशाळेत ठेवले.

कंस हा खूप अत्याचारी राजा होता, त्याचे त्रासाने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती. त्याच्या राज्यात निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा देण्यात येई.

आकाश वाणी झाल्याने आपल्या मृत्यूच्या भीतीने त्याने आपल्या बहिणीला आणि वासुदेवाला काळकोटरी मध्ये टाकले, एवढेच नव्हे तर कंसाने देवकीची सहा पुत्रांचा वध सुद्धा केला.

भगवान श्रीकृष्णाच्या जन्म दिवशी आकाशातून घनघोर पावसाची वर्षा चालू होती. भगवान श्री कृष्णाच्या जन्मा नंतर श्री कृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वासुदेव यांनी कृष्णाला एका टोपली मध्ये ठेवले.

वसुदेवांनी ते टोपली आपल्या डोक्यावर ठेवून यमुना नदी पार करत त्यांनी श्रीकृष्णाला आपल्या मित्र नंद गोपाल कडे नेले आणि भगवान श्रीकृष्णाला माता यशोदा पाशी ठेवून त्यांची कन्या ला घेऊन आले.

अशा प्रकारे देवकी पुत्र भगवान श्री कृष्णाचे पालन- पोषण यशोधा मातेने केले.

अशा प्रकारे अत्याचारी कंसाला मरण्यासाठी साक्षात देवाने श्री कृष्णाचे रूप धारण करून जन्म घेतला. गोकुळाष्टमी हा सण हिंदू धर्मासाठी महत्वाचा सण समजला जातो.

Information About Gokulashtami in Marathi

गोकुळाष्टमी कशी साजरा करतात । How Gokulashtami is celebrated :

भारतात आणि जगभरातील काही भागात अतिशय आनंदाने गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मथुरा नगरीत मध्यरात्रीच्या वेळी श्री कृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला.

कंसाचा वध करण्यासाठी आणि संपूर्ण जनतेला कंसाच्या प्रहारा पासून वाचविण्यासाठी श्री कृष्ण भगवान पृथ्वीवर आवतारले.

गोकुळाष्टमीच्या या पावन आणि पवित्र दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भारतात आणि परदेशात कृष्ण देवाची पूजा, भक्ती आणि आराधना केली जाते.

गणेश चतुर्थी बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा : गणेश चतुर्थी माहिती

भक्त गोकुळाष्टमीच्या उत्सवा वर उपवास करतात. श्री कृष्णाची सर्व मंदिरे सजवले जाते तसेच श्री कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून बारा वाजता कृष्णाचा जन्म झालता म्हणून बारा वाजता पाळणा म्हणला जातो, आणि गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो.

तसेच, गोकुळाष्टमीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर मंदिरात भजन- किर्तन केली जाते. त्याबरोबरच संपूर्ण तरुण वर्ग दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आयोजित करतात.

श्री कृष्ण जन्म ठिकाण मथुरा येथे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. या दिवशी संपूर्ण मथुरा नगरी श्री कृष्णाच्या नावात भजन- कीर्तना मध्ये दुमदुमून जाते.

श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी दूध, दही, लोणी आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन चोरी करून खात. दही आणि लोणी हे त्यांचे आवडते खाद्य होते. म्हणून दहीहंडी चा उत्सव साजरा करुन श्री कृष्णाची आठवण केली जाते.

दही हंडीच्या उत्सवासाठी एक प्रसाद तयार केला जातो त्या प्रसादाला ” गोपाळकाला ” असे म्हणतात.

दही हंडीच्या उत्सवा दिवशी एका मडक्यात दही- दूध, लाह्या, काकडी भरतात आणि उंच मनोऱ्यावर ती दहीहंडी अडकवता. श्री कृष्ण प्रेमी तरुण मंडळी दही- दुधाने भरलेली तो हंडा फोडण्यासाठी ” गोविंदा ” हा खेळ खेळतात.

” गोविंदा आला रे आला ” ! गोकुळात आनंद झाला ।।

अशी गीत म्हणत दहीहंडी फोडली जाते.

दहीहंडी फोडल्याने लाह्या, दही, ताक, साखर, फळांच्या फोडी इत्यादी खाद्य पदार्थांचा प्रसाद सर्व भक्तांना वाटला जातो.

तसेच काही ठिकाणी श्रीकृष्णाची सोंगे करण्याचही प्रथा आहे.

तर काही भागांत संपूर्ण श्री कृष्ण लीलांचे आयोजित करून श्री कृष्णाची संपूर्ण कथा प्रदर्शित केली जाते.

अशा प्रकारे संपूर्ण भारतात गोकुळाष्टमी हा सण साजरा केला जातो.

Information About Gokulashtami in Marathi

गोकुळाष्टमी साजरा करण्याची पद्धत । Method of celebrating Gokulashtami :

हिंदू धर्मातील मुख्य देवता भगवान श्री कृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे ” गोकुळाष्टमी “. हिंदू लोका या दिवशी उपवास ठेवतात, तसेच कृष्णाची पूजा करतात, रात्री उशीर पर्यंत जागून भजन- किर्तन प्रार्थना करतात. बाळ कृष्णाची मूर्ती अथवा फोटो पाळण्यात ठेवून त्यांना झोका देतात.

अशा प्रकारे भारतात सर्व साधारणपणे गोकुळाष्टमी साजरी केली जाते.

पण भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या रीतीने गोकुळाष्टमी साजरा केली जाते.

कुठल्या प्रांतात कश्या प्रकारे गोकुळाष्टमी साजरी होते हे आपण बघणार आहोत. यामध्ये

महाराष्ट्र :

गोकुळाष्टमी हा सण महाराष्ट्र राज्यात अगदी आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्याबरोबरच गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी असणारी दहीहंडी ही महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी होते.

येथे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंद पथक स्पर्धा आयोजित केल्या जातात. दही हंडी फोडणाऱ्या पथकाला बक्षीस सुद्धा देतात.

श्री कृष्णाची मंदिरे सजवून रात्रभर भजन- कीर्तन करत. गोकुळाष्टमी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते.

आसाम :

आसाम राज्यात ही गोकुळाष्टमीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

आसाम मध्ये या दिवशी श्री कृष्णाची मंदिर सजावट केले जातात. तसेच या दिवशी येथे अन्न आणि फळे वाटप करून श्री कृष्णाला प्रार्थना केली जाते.

तमिळनाडू :

तमिळनाडू राज्यातही गोकुळाष्टमी या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. तमिळनाडू मधील लोक जमिनीवर तांदळाच्या पिठापासून सुंदर नक्षी कला काढतात.

कृष्णाच्या पायाचे ठसे घराच्या दारापासून घरापर्यंत काढतात. तसेच कृष्णाचे पूजा करत कृष्ण गीते म्हणून कृष्णाची आराधना केली जाते.

मणिपूर :

मणिपूर मध्ये सुद्धा गोकुळाष्टमीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मणिपूर राज्यात गोकुळाष्टमीला कृष्णा जन्म असे म्हटले जाते.

मणिपूर राज्यातील इंफाळ येथील गोविंदाची मंदिर आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस टेम्पल ( International Society for Krishna Consciousness Temple ) येथे गोकुळाष्टमीचा खूप मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.

अशा प्रकारे भारतातील विविध प्रांतात श्री कृष्णाचा जन्मदिवस गोकुळाष्टमी खूप आनंदात साजरी केली जाते.

तर मित्रांनो ! ” गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती । Information About Gokulashtami in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती । Information About Gokulashtami in Marathi “ यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

Information Essay