योगा बद्दल संपूर्ण माहिती । योगाचे चे फायदे । Yoga Information in Marathi

By Information Essay •  1 min read

योगा बद्दल संपूर्ण माहिती । योगाचे चे फायदे । Yoga Information in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले Information Essay वेबसाइटवर खूप खूप स्वागत आहे.या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” योगा बद्दल संपूर्ण माहिती । योगाचे चे फायदे । Yoga Information in Marathi “  घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे, या वेबसाईटवरील सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

योगा बद्दल संपूर्ण माहिती । योगाचे चे फायदे । Yoga Information in Marathi

योग ही संकल्पना आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून आलेली आहे. योग योग हा व्यायामाचा एक प्रकार आहे प्रकार आहे. आपण व्यायाम म्हणजे शरीराचा व्यायाम असे समजतो. परंतु योगा हा मानाचा आणि आत्म्याचा व्यायाम आहे.

आपल्यातील बऱ्याच जणांना योग म्हणजे काय ?योगाचे प्रकार म्हणजे काय? योगाचे महत्त्व काय? हे माहीतच नाही. म्हणून आम्ही आजच्या आर्टिकल मध्ये योगा ची संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेत(Yoga Information in Marathi) घेऊन आलोत.

 योग म्हणजे काय ( What is Yoga in Marathi ) ?

योग हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज’शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणे असा होतो. योगी भारतात भारतातील आल्या पाच वर्षापासून चालत आलेली एक प्रकारची जीवनशैली आहे.

काही लोक योग म्हणजे किंवा योगासन म्हणजे शरीराचा व्यायाम समजतात, शरीर ताणने, वाकवणे असे समजतात.

परंतु योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून, योग हा मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे. तसेच योगा अभ्यास मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.

तर काही तज्ञांच्या मते, ” योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे, तर योग हा भावनात्मक समतोल आणि त्या आनादी आनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.

 योगा चा इतिहास ( History Of Yoga ) :-

योग ही पाच हजार वर्षापासून चालत आलेली एक परंपरा आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सूक्त आणि प्राचीन अशा ऋग्वेदात आढळतो. तसेच योग हा प्राचीन सिंधू आणि सरस्वती सभ्यतेच्या दर्शन सुद्धा घडवतो. या सभेचे मधील पशुपतिनाथ यांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळाचे योगाचे प्रतीक दर्शवते.

तसेच अति प्राचीन उपनिषद बृहद आरण्यक मध्ये काही शाररिक आसनांचा उल्लेख आढळतो. तसेच या मध्ये प्राणायाम चा सविस्तर उल्लेख सुद्धा आढळतो.

प्रसिद्ध संवाद ” योग याज्ञवाल्क्य “, जो बाबा याज्ञवाल्क्य आणि शिष्य गार्गी त्यांच्यातील संवाद आहे, ज्याचे वर्णन बृहद अरण्यक उपनिषद मध्ये आहे. यामध्ये श्वास घेण्याचे कित्येक प्रकार, शाररिक शुद्धतेसाठी गरजेचे आसने, आणि ध्यानाचा उल्लेख आहे. व यामध्ये योगासनाचा उल्लेख आहे.

अर्थ वेदातील एका संन्याशाच्या चर्चेनुसार, शारीरिक आसने योगासने म्हणून विकसित होऊ शकतात.

तसेच महाभारत आणि भगवद्गीतेच्या फार पूर्वी 20 पेक्षा आधीख उपनिषदांमध्ये सर्वच्च चैतने सोबत मनाचे विलीन होणे म्हणजे योग असे सांगितले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मूलभूत सूत्रांच्या रुपात योगाची चर्चा आढळते.

अशाप्रकारे आपल्या प्राचीन संस्कृतीपासून योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

 योगाचे महत्व ( Imporatance of yoga in Marathi ) :-

प्राचीन संस्कृती पासूनच योगला फार महत्त्वाचे स्थान आहे. खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये योगाला फार महत्त्वाचं स्थान आहे. योगा फक्त व्यायामाचा प्रकार नाही तर, योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसंरत प्राप्त होते.

सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण सर्व काम करतो परंतु आपल्या शरीराकडे लक्ष देण्याकरता पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे आपल्या शरीरावरून आपले दुर्लक्ष होते.

व्यायमाचे आणि योगाचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. रोज योगा केल्याने आपल्या जीवनातील ताण तणाव नाहीसा होतो. त्यासोबतच मानवाचे शरीर निरोगी राहते. माणसाच्या हाड मांस, पेशी, वजन कमी होऊन लठ्ठपणा नाहीसा होतो.

शरीर दणकट राहते व शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय दररोज योगा केल्याने शरीर सर्व रोगांपासून वंचित राहते. योगामुळे रक्तदाबा सारख्या समस्या नाहीसा होतात.

 योगाचे प्रकार ( Different Types of Yoga ) :-

योग अभ्यासात विविध प्रकारच्या योगाचा समावेश केला जातो. प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात तीन मुख्य प्रकाराचे पुन्हा विविध प्रकार पडतात. आजच्या आर्टिकल मध्ये ” Yoga Information in Marathi “ आपण फक्त योगाचे मुख्य तीन प्रकार बघणार आहोत

 ज्ञानयोग / दर्शन शास्त्र

 भक्तियोग / भक्ती- आनंदाचा मार्ग

 कर्मयोग / सुखमय कर्ममार्ग

 योगा करण्याची पद्धत ( Method of Doing Yoga in Marathi ) :-

योगा करणे हे आपल्या जिवनासाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु योग करताना योगाची योग्य पद्धत समजून योग करणे आपल्या शरीराला फायदेशीर ठरू शकते.

योगा करण्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

 ध्यान ( Meditation ) :- 

ध्यान करणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रोज काही मिनिटे आपण डोळे झाकून ध्यानाच्या स्थितीत बसल्यास शरीरामध्ये आणि मनामध्ये शक्तीचा संचार होतो. विशेषता सकाळच्यावेळी ध्यान केल्याने मन प्रसन्न आणि एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. मन एकाग्र आणि शांत राहते. त्यामुळे आपला ताण तणाव नाहीसा होतो.

 शलभासन ( Shalabhasana ) :-

बराच व्यक्तींना पाठ आणि कमरेचा त्रास होत असतो विशेषतः महिलांना. गरोदर पणा नंतर सहसा सर्वच महिलांना कमरेचा आणि पाठीचा त्रास होतो. अशावेळी शलभासन हे आसन केल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होतेे. या आसनामुळे पाठाचे आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात. शलभासन हे आसन नियमित केल्याने कमरेचा आणि पाठीचा त्रास कायमस्वरूपी नाहीसा होण्यास मदत होते.

 नाडी शोधन प्राणायाम ( Anulom Vilo ) :-

आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी करायचे असेल तर नाडी शोधन प्राणायाम फायदेशीर ठरते. या प्राणायाम मध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. त्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण राहते. त्यामुळे हा योगाचा प्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो.

 भुजंगासन ( Bhujangasana ) :- 

प्रत्येक आसन हे आपल्या शरीरासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदेशीर ठरते. छाती आणि शरीरातील मांसपेशी दूर करण्यासाठी व कंबरेतील तणाव दूर करण्यासाठी हे प्राणायाम फायदेशीर ठरते. मंरूदंड संबंधित आजारी व्यक्तींना हे व्यायाम केल्याने खूप फायदा होतो. महिलांना गर्भाशयातील रक्तभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी भुजंगासन आसनाची खूप मदत होते.

 अर्ध चक्रासन ( Ardha chakrasana ) :-

ज्या व्यक्तींना व्  मधुमेहा सारखा आजार असतो त्यांना अर्ध चक्रासन उपयुक्त ठरते. तसेच पोटातील चरबी पासून मुक्तता हवी असेल तर त्यावर अर्ध चक्रासन हा उत्कृष्ट उपाय आहे. हे आसन केवळ मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने करावे.

 योगाचे दहा फायदे ( Ten Benefits Of yoga In Marathi ) :-

योगासन करणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आजचे आर्टिकल योगाची माहिती( Yoga Information in Marathi) या मध्ये आम्ही योगा मुळे होणारे दहा फायदे सांगितले आहेत. वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असेल ती देण्यासाठी योगा समर्थ आहे.

 सर्व स्तरांवर तंदुरुस्ती ( All Round Fitness ) :-

दररोज नियमित योगासन केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहून मानसिक आरोग्य सुद्धा निरोगी राहते.जीवनात प्रेम आनंद आणि उत्साह आणि सर्व बाबतीत तो स्फूर्ती हवी तर  योगा करणे फायद्याचे ठरू शकते.

 वजनात घट ( weight loss ) :-

लठ्ठपणा अतिरिक्त वजन  एवढे कमी करण्यासाठी योगा फायदेशीर ठरतो. योगातील सूर्यनमस्कार,कपालभाती  आणि प्राणायाम हे योगांचे प्रकार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

 ताणतणावापासून मुक्ती ( Stress relief ):-

आपल्या शरीरातील आणि मनातील ताण तणाव दूर करायचा असेल तर त्यासाठी  योग फायदेशीर ठरतो. योगातील ध्यान ,प्राणायाम आणि योगासने  नियमित केल्याने  ताणतणावापासून मुक्ती मिळते.

 अर्तमायी शांतता ( Inner peace ) :- 

धावपळीच्या आणि ताण-तणावाच्या या जीवनामध्ये शांतता कोणाला नको आहे?   आपले मन शांत आणि निसर्ग ठेवण्यासाठी योगा आपल्याला खूप फायदेशीर ठरते.  घर बसल्या  योगा करून आपण आपले मन,अंतर्मन शांतता करू शकतो.

 रोग प्रतिकार शक्ती वाढते ( Improved Immunity ) :-

शरीर मन आणि आत्मा      या तिघांच्या आपली एक संंघी यंत्रणा बनवलेली असते. त्यामुळे शारीरिक  अस्वस्थ पणा मुळे आपल्या मनावर तनाव पडतो. अशावेळी आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. जर ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर आपण नियमित योगा  करणे अपेक्षित आहे.

 सजगतेत वाढ होते ( Living with Greater Awareness ) :- 

आपल्या  माणस असतात कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये गुंतलेले असते.  कधी भूतकाळाचा  विचार  करते, तर कधी येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करते.  आपल्यातील सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्यात लगेच लक्षात येते. योगासन केल्याने आपण आपल्या मनाला शांत करू शकतो. योगामुळे  आपल्या मनाची सजगता  वाढण्यास मदत होते.

 नाते संबंधात सुधारणा ( Better Relationships ) :-

तुमच्या जोडी दाराचा, आई-वडिलांचा किंवा  मित्र-मैत्रिणी च्या संबंध योगामुळे  सुधारतात. ताणतणाव  चिडचिडपणा नाहीसा होतो. तणाव मुक्त,आनंदी आणि समाधानी मन नातेसंबंधनासारखा संवेदनशील  संबंधात फार उपयोगी पडतात. योग आणि ध्यानधारणेमुळे मन सतत प्रसन्न, आनंदी आणि  शांत राहते.

 ऊर्जा शक्ती वाढते ( Increased Energy ) :- 

दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे आणि दगदगीच्या जीवनामुळे शरीरातील ऊर्जेचे प्रमाण कमी होते. सतत दिवसभर काम केल्याने आपण फार थकून जातो.  परंतु अशा वेळी दिवसातून थोडा वेळ आपण योगा केल्याने आपल्या शरीरातील ऊर्जेचे प्रमाण वाढते व आपला थकवा नाहीसा होतो.

 शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते ( Better Flexibility and posture ) :-

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नियमित योगा,योगासने केल्यास  शरीर सशक्त चपळ आणि लवचिक बनते. शरीराचे स्नायू बळकट बनतात व शरीराला योग्य प्रकारची ठेवण तयार होते.

 अंतर ज्ञानात वाढ ( Better intuition ) :- 

योगासने केल्याने आपल्या अंतर ज्ञानात वाढ होते. ही क्षमता वाढवणे योग आणि ज्ञान धारणे मध्ये  आहे.या  क्षमतेमुळे योग्य  आणि अचूक निर्णय  घेऊ शकतो.

 योग काळाची गरज :

आजचे जीवन इतके धावपळीच्या आणि गतिमान झाले आहे त्यामुळे प्रत्येक जण आपल्या एक आणि मानसिक आरोग्य पासून वंचित राहतात. त्यामुळे शरीर अस्वस्थ होते. वेगवेगळ्या आजारांना आपण बळी  पडतो.  आपल्यातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला योग करणे हे गरजेचे आहे. व योगासन हे सध्याच्या काळाची गरज आहे.

तर मित्रांनो ! ” योगा बद्दल संपूर्ण माहिती । योगाचे चे फायदे । Yoga Information in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” योगा बद्दल संपूर्ण माहिती । योगाचे चे फायदे । Yoga Information in Marathi ” यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर,कमेंट करून नक्की कळवा.

हे देखील अवश्य वाचा :-

Information Essay