गणेश चतुर्थी माहिती मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi

By Information Essay •  1 min read

Ganesh Chaturthi Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” गणेश चतुर्थी माहिती मराठी | Ganesh Chaturthi Information in Marathi   घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आपण वर्षभरात किती सारे सण साजरा करतो, त्यातील सर्वांचे आवडतीचा सण म्हणजे ” गणेश चतुर्थी.”

गणेश चतुर्थी माहिती मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi

गणेश चतुर्थी माहिती मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi
Ganesh Chaturthi Information in Marathi

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे,गणेश चतुर्थी. या दिवशी संपूर्ण देशभराची जिकडे तिकडे गणपतीची मूर्ती आणून तिची स्थापना करण्याची धमाल चालू असते. गणेशाची मूर्ती वाजत गाजत आणून घरांमधील  देवस्थानांमध्ये बसवतात. भक्तिभावाने गणपतीला दुर्वा वाहतात आणि मोदकाचा नैवेद्य दाखवतात.

भारतातील महाराष्ट्र या राज्यात मुख्यतः गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Ganesh Chaturthi याला गणेश उत्सव,विनायक चतुर्थी असेसुद्धा म्हटले जाते. संपूर्ण भारतात गणेशोत्सव म्हणून मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. या सणाला भारतातील सर्व सणांपैकी सर्वात मोठा सण म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, कारण Ganesh Chaturthi हा सण दहा ते अकरा दिवसांचा सण असतो. दहा ते अकरा ते दिवस गणपतीची मूर्ती घरांमध्ये बसून तिची भक्तिभावाने पूजा-अर्चना केली जाते.

गणेश चतुर्थी ची माहिती | Ganesh Chaturthi Information in Marathi

  Ganesh Chaturthi हा आता भारतातील सर्वात लोकप्रिय सण आहे.भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने Ganesh Chaturthi साजरी केली जाते.

गणेश देवता हे बुद्धी आणि समृद्धीचे देवता असल्याने सर्वत्र गणेशा देवाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीची परंपराही खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

एका प्राचीन आणि सत्य पौराणिक कथेनुसार, जेव्हा शिवशंकर गणेशावर वार करतात, त्यामध्ये गणेशाचे शिश त्यांच्या धडापासून वेगळे होते. त्यावेळी शिवशंकराचा आदेशावरून नंदी श्री गणेश साठी नवीन शीश शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने जातात. जो काही प्राणी किंवा व्यक्ती पहिल्यांदा दृष्टीस पडेल, त्याचे शिष घेऊन येण्याचा आदेश सर्व देवांकडून आलेला असतो.

अशावेळी सर्वप्रथम हत्ती हा प्राणी नंदी यांच्या दृष्टीस पडतो, त्यामुळे त्या हत्तीचे शिश घेऊन येतात. अशाप्रकारे श्री गणेशा पुन्हां जीवनदान मिळाले. त्यावेळी सर्व देवी देवता गणपतीला आद्यदैवताची वरदान देतात. कुठलाही देवताची पूजा करण्या अगोदर गणपतीची पूजा केली जाते. व तेव्हापासूनच Ganesh Chaturthi हा उत्सव साजरा करण्याची प्रथा चालत आली आहे.

Ganesh Chaturthi दिवशी श्री गणेशा भक्तासाठी पृथ्वीवर अवतरले. गजमुख असलेल्या श्री गणेशा हा सर्व प्रकारची बुद्धिमत्ता ऐश्वर्या आणि सौभाग्य मिळवून देणारा देवत आहे,  आणि गणेश हे शिव पार्वती यांचे पुत्र आहेत.

गणेश चतुर्थी माहिती मराठी  । Ganesh Chaturthi Information in Marathi
Ganesh Chaturthi Information in Marathi

 Ganesh Chaturthi या दिवशी विविध रुपात गणेशाची पूजा केली जाते. गणपतीच्या काही मुर्त्या या कृष्णाच्या रुपात असतात तर काही शिवशंकराचा तर काही गणपतीच्या बाल रूपात असतात. यातील कुठल्याही एका रूपाच्या  मूर्तीची स्थापना केली जाते.

 गणेश चतुर्थी हा भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला येणारा हिंदुधर्माचा महत्त्वाचा सण आहे.

गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत | Ganesh Chaturthi Information in Marathi

 गणेश चतुर्थी हा दहा ते अकरा दिवसाचा गणपतीचा सण आहे. संपूर्ण भारतात गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून दहा दिवस भक्तिभावाने पूजा केली जाते. त्यांच्याकडून मिळालेल्या या सृष्टीतील सर्व गोष्टी आपण त्यांनाच अर्पण करतो. गणपतीचा आवडता पदार्थ मोदकाचा भोग ठेवून दहा दिवस गणपतीचे अर्चना करीत पूजा आरती करतो.

 गणपती हे एक आपल्या हिंदू संस्कृती तील  एक प्रसिद्ध दैवत आहे.  संकटाचा  नाश

 करणारे,सुख देणारे महान दैवत आहे. म्हणून लहानपणापासून थोरापर्यंत सर्वजण मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने गणपती पूजा करतात. व घरोघरी गणपतीची आरती होते.

 काही लोकांच्या घरी गणपती हे दीड दिवसाचे असतात तर  काहींच्या घरी पाच दिवसाचे असतात,  तर काहीजण सात दिवसाचा गणपती बसवतात. सार्वजनिक ठिकाणी आणि काहींच्या घरी दहा किंवा अकरा दिवसाचे गणपती असतात.

 गणपती ज्या दिवशी येतात त्या दिवशी गणपती पूजन केले जाते.  काही जन होम-हवन मोठी पूजा करून गणपतीला आपल्या घरी घेऊन येतात.

 दहा दिवस गणपतीच्या दिवसात वेगवेगळे सण साजरे केले जातात जसे की, गणपती आल्यानंतर दोन दिवसानंतर गौरी आवाहन होते, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.

 असे म्हणतात की गौरी म्हणजे गणपतीच्या बहिण असतात गणपतीला भेटण्यासाठी दोन दिवसाकरीता  गणेश चतुर्थी च्या दरम्यान येतात.

 काहीजण गौरी च्या मुर्त्या सुद्धा स्थापित करतात व त्यांची पूजा करतात. गौरी आव्हान होते त्या दिवशी सर्वजण गौरीला संध्याकाळच्या वेळी वाजत-गाजत आपल्या घरामध्ये घेऊन येतात. व गौरीची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी गणपतीसोबत गौरींना पुरणपोळीचा नैवेद्य करून दाखवला जातो व गौरीची आरती केली जाते.

 तिसऱ्या दिवशी पुन्हा गौरीची आरती करून सायंकाळी गौरी विसर्जन केले जाते.

 दहा दिवसांमध्ये नंतर अगदी थाटामाटात गणपतीचे विसर्जन केले जाते. गणपतीचे विसर्जन करताना गणपती ला पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली जाते.

” गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या ||”

गणेश चतुर्थी माहिती मराठी  । Ganesh Chaturthi Information in Marathi
Ganesh Chaturthi Information in Marathi

 असे मनात अगदी थाटामाटात, जल्लोषात, विविध फुलांच्या रथात आणि देखावे करत गणपतीच्या मूर्तीसमोर लेझीम,ढोल ताशा असे कार्यक्रम करत असे गणपतीचे विसर्जन केले जाते.

सर्वांचे दुःखे दूर करून सर्वांना हसत खेळत वातावरणामध्ये ठेवून दहा दिवसानंतर अखेर गणपती विसर्जनाची वेळ येते.

 या दहा दिवसांमध्ये सर्वजण एकत्रित येतात उत्साहात आणि आनंदात सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मुर्त्या स्थापित करतात. त्यात सुंदर देखावा केला जाता व विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तर काही ठिकाणी संपूर्ण गणपतीची कथा दर्शवली जाते.

 गणपतीच्या सणातून आपल्याला एक संदेश मिळतो तो म्हणजे की देव हा मूर्तीत किंवा दगडात नसून तो माणसा-माणसांत आहे.

 गणेश चतुर्थी म्हणजे एक प्रकारे जात धर्म-भेद विसरून सर्वांना एकत्रित आणणारा सण आहे.

 अशाप्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रुपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थी मागची मूळ संकल्पना आहे.

गणेश चतुर्थी माहिती | Ganesh Chaturthi Information in Marathi

 गणेश चतुर्थी म्हणजे आनंद ,उत्सव ,पूजा ,भक्ती आणि समानता व समन्वय आहे.

 श्री गणेश हा आपल्या मध्ये असलेल्या अनेक चांगल्या व उत्कृष्ट गुणांचा देव आहे जेव्हा भक्तिभावाने गणेशाची पूजा करतो तेव्हा आपल्या मध्ये असलेले चांगले गुण खुलू लागतात. ज्या व्यक्तींमध्ये अहंकार,राग, द्वेष असतो  त्या व्यक्तीमध्ये ना ज्ञान असते, ना बुद्धी असते,ना प्रगती असते.

 त्यामुळे आपल्यातील सर्व  दुर्गुणांना काढून चांगल्या चेतनेला जागृत करणे आणि चिंतनाचा अधिकार जाणणे म्हणजे खऱ्या अर्थाने  श्री गणेश आहे.

 आपल्यातील ही चेतना जागी व्हावी यासाठी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभकार्याच्या अगोदर श्री  गणेशाची पूजा केली जाते.

 अशा प्रकारे गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती स्थापन करून त्या मूर्तीची भक्तिभावाने पाणी प्रेमाने पूजा करण्याने आणि सतत गणेशाचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यात असलेल्या गणेशाचा अनुभव घेता येतो.

 आपल्यातील  गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी साजरी करण्यामागची खरी भावना आहेत.

 मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांना एकत्र आणण्यासाठी एक चांगली संधी गणेश चतुर्थी या सणा मधून मिळते.

 तसेच संपूर्ण जगभरात नावाजलेला आणि आज पूजेचा मान असणारा हा श्री गणेश देवता आरोग्य क्षेत्रातचा  एक प्रतीक आहे.

 श्रीगणेशाला आपना भोग किंवा  नैवेद्य दाखवतो आणी पूजेसाठी ज्या वस्तू अर्पित करतो त्यामधून आपल्या शारीरिक विकारांवर मात कशी करायची याचे मार्गदर्शन जणू स्वतः गणपती देवताच करतो.

 गणपती देवताला आवडणाऱ्या दूर्वा या पित्त विकारावर मात करतात. तर परिपूर्ण शोधा शांतीचे  प्रतीक म्हणजे केळी आणि मोदक.

 तर वात विकारांवर उपयुक्त असणारा नारळ आपण गणपतीला वाहतो. गणपतीला आवडणारे फुल म्हणजे जास्वंद आणि हे जास्वंद फुल सुद्धा रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. अशा प्रकारे विविध पातळ्यांवरून आरोग्य रक्षणाचा मंत्र देणारा देवता श्रीगणेश आहे.

  अशाप्रकारे सर्व दृष्टीतून महत्त्वाचा असणारा हा Ganesh Chaturthi सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे.

 तर मित्रांनो! गणेश चतुर्थी माहिती मराठी | Ganesh Chaturthi Information in Marathi वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” गणेश चतुर्थी माहिती मराठी | Ganesh Chaturthi Information in Marathi ”  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

 धन्यवाद!

Information Essay