“धनतेरस पूजा विधी” मराठी मध्ये । Dhanteras Puja Vidhi in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले Information Essay या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती अथवा निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” धनतेरस पूजा विधी ” मराठी मध्ये । Dhanteras Puja Vidhi in Marathi “ घेऊन आलेत.
आम्हाला खात्री आहे की,आहे वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

” धनतेरस पूजा विधी ” मराठी मध्ये Dhanteras Puja Vidhi in Marathi
भारतामधील सर्वात महत्त्वाचा आणि धार्मिक उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या दोन दिवस आगोदर साजरा केला जाणारा सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस.
धनत्रयोदशी हा दिवाळी सणाच्या दोन दिवस आगोदर साजरा केला जातो. धनत्रयोदशी सर्व हिंदू बांधव आपले आरोग्य चांगले रहावे त्यासाठी भगवान धन्वंतरी ची उपासना करतात. धन्वंतरी ही हिंदू पुराणांनुसार चांगल्या आरोग्याचे आणि आयुर्वेदाचे देवता आहे.
धनत्रयोदशी या दिवशी सोने चांदी यांचे खरेदी करणे शुभ मानले जाते.
धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणजे काय What is Dhanteras or Dhantrayodashi ?
अश्विन कृष्ण त्रयोदशी धनत्रयोदशी असे म्हटले जाते. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या सनाला धन ,पैसा ,सोने-चांदी यांची पूजा केली जाते. तसेच धनत्रयोदशी शेतकरी किंवा व्यवसायातील लोक आपापल्या अवजारांची पूजा करतात.
शेतकरी शेतात लागणाऱ्या अवजारांची म्हणजे कुळव, नांगर ,तिफन या अवजारांची पूजा करतात.तर व्यावसायिक लोक किंवा व्यापारी एका पाटावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेऊन लक्ष्मीची पूजा करतात.
तसेच या दिवसापासून नवीन लिखाणाच्या वह्या किंवा हिशोबाच्या वह्या यांची पूजा करतात अथवा नवीन वही घेऊन त्याची पूजा करून लिखाणाला सुरुवात करतात.
बायका तिजोरीतील सर्व सोन्याचे दागिने बाहेर काढून त्यांची पूजा करतात. तर शेतकरी शेतामध्ये पिकलेले धान्य यालाच आपले धन मानून धान्याची पूजा करतात.
दिवाळी सणाची सुरुवात या धनत्रयोदशीपासून होते त्यामुळे सर्वजण घाराला रोषणाईने आणि दिवे लावून सजवतात.
धनत्रयोदशी/ धनतेरस कधी साजरी केली जाते When is Dhantrayodashi / Dhanteras celebrated ? :
धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याचा तेराव्या दिवशी म्हणजे दिवाळी सणाचा दोन दिवस अगोदर साजरी केली जाते. धनत्रयोदशी पासून दिवाळी या सणाला सुरुवात होते. म्हणून आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.

धनतेरस म्हणजेच धन. म्हणून या दिवशी धनाची म्हणजेच पैशाची पूजा केली जाते.
पैसा ,सोने-चांदी यांच्या पूजा करून आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जाते.
धनतेरस किंवा धनत्रयोदशी चे महत्व Importance of Dhanteras or Dhantrayodashi :
प्रत्येक सण किंवा उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही महत्त्व असतेच. प्रत्येक सणाचे आपल्या विशेष असे महत्व असते.
त्याप्रमाणेच, या सणाचे विशेष महत्त्व म्हणजे या सणाला धनाची पूजा केली जाते.
या दिवशी धन्वंतरी या देवाची पूजा केली जाते.
पौराणिक मान्यता नुसार, देव आणि दानवांनी मिळून केलेला सागर मंथना मध्ये धन्वंतरी हे देवता हातात अमृत घेऊन सागरातून प्रकट झाले. पुराणातील काही उल्लेखानुसार असे दिसून येते की, धन्वंतरी हे देवता विष्णूचे एक अवतार होते.
आश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी या देवता चा जन्म झाला त्यामुळे धनत्रयोदशी साजरी केली जात असावी. त्यामुळे या दिवशी धनाची पूजा केली जाते. तसेच धनत्रयोदशीला ” धन्वंतरी जयंती” असेही म्हणतात.
संध्याकाळच्या वेळी ईशान्य दिशेला तोंड करून धनवंतरी देवाची प्रार्थना केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते त्यामुळे ह्या दिवशी सर्वजण धन्वंतरी दैवताला दीर्घायुष्यासाठी आणि स्वस्त जीवनासाठी प्रार्थना करतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने धन्वंतर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे संपूर्ण वैद्य मंडळी धन्वंतरी देवता ची पूजा करतात.व प्रसाद मध्ये कडुलिंब ची पाने आणि सखर लोकांना प्रसाद म्हणून वाटतात. असे म्हणतात कडुलिंबाची उत्पत्ती ही अमृता पासून होते मानून कडुलिंबा मध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आहेत. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा देवता आहे त्यामुळे या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद देवाला दाखवतात.
तसेच या धनत्रयोदशीला दिवाळी या सणाची सुरुवात होते त्यामुळे धनत्रयोदशी या दिवशी एक कणिकाचा दिवा करून तो घराबाहेर दक्षिण दिशेला त्याचे तोंड करून लावून त्याला नमस्कार केल्याने अपमृत्यू टळतो.
अशाप्रकारे धनतेरस केव्हा धनत्रयोदशी या सणाचे महत्त्व आहे.
धनतेरस किंवा धनत्रयोदशी च्या पौराणिक कथा Mythology of Dhanteras or Dhantrayodashi :
प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी विशेष महत्त्व किंवा पौराणिक कथा असतात. त्याप्रमाणे धनतेरस केव्हा धनत्रयोदशीच्या आहे काही पौराणिक कथा आहेत.
या कथेनुसार,एकदा एक भविष्यवाणी झाली होती त्या भविष्यवाणी नुसार हेम पुष्प राजाचा पुत्र त्याच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. राजा आणि राणी ठरवतात कि आपल्या पुत्राने जीवनातील सर्व सुख भोगावे त्यासाठी ते दोघं त्यांच्या पुत्रांचा विवाह करतात. लग्नाच्या चार दिवसानंतर हेमपुष्पा राजांच्या मुलाचे सोळा वर्ष पूर्ण होणार होते वतन मृत्युमुखी पडणार होता.
त्यामुळे त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या संपूर्ण खोलीमध्ये सोने, चांदी, हिरे भरून हांडे ठेवते. त्याच्या अवतीभवती तो सर्व सोन्याचे हिरे, चांदी दागिने ठेवते प्रवेश दारावर ती सर्वत्र सोन्याच्या मोहरा ठेवते संपूर्ण खोली सोन्या चांदीच्या प्रकाशात चमचमत असते. त्या प्रमाणेच संपूर्ण महलामध्ये लखलखीत प्रकाश केलेला असतो. गाणी व गोष्टी चा कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण रात्र राज्याच्या पुत्राला ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा यमराज राजाच्या पुत्राला घ्यायला येतो तेव्हा खोलीमध्ये असणाऱ्या संपूर्ण प्रकाशामुळे त्याचे डोळे चमकत असतात. त्यामुळे यमराज राजाच्या पुत्राला घेऊन जाऊ शकत नाही व राजाच्या पुत्राचा मृत्यू टळतो. अशाप्रकारे राजकुमारचे वाचतात.
त्यामुळे धनत्रयोदशी ” यमदिपदान ” असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याचे टोक दक्षिण दिशेला ठेवतात व त्या दिव्याला नमस्कार केल्यास घरातील सदस्यांचा अपमृत्यू टळतो असे म्हणतात.

तसेच धनत्रयोदशीची आणखी एक कथा आहे त्या कथेनुसार, जेव्हा इंद्र देवाने दानवांना सोबत घेऊन सागर मंथन केले होते, तेव्हा सागरातून धन्वंतरी देवता सोबत देवी लक्ष्मी सुद्धा प्रकटली होती. म्हणून या दिवशी धन्वंतरी देवता सोबत माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
तसेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती सुद्धा म्हटले जाते.
धनतेरस / धनत्रयोदशी ची पूजा विधी Worship method of Dhanteras / Dhantrayodashi :
धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी या दिवशी सकाळी लवकर उठून धन्वंतरी या देवाची संकल्पना करावी. धनवंतरी देवाची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी.धन्वंतरी पूजेच्या अगोदर गणपतीची पूजा करून घ्यावी.
त्यानंतर धन्वंतरीचे आवाहन करावे. वा धन्वंतरी देवतांची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर ” ओम श्री धन्वंतरै नमः” या मंत्राचा जप करावा.
तसेच ,
” ओम नमो भगवते महासुदर्षणाय वासुदेवाय
धनवंतराये: अमृत कलश हस्ताय सर्वभाय विनाशाय
सर्वरोगनिवारणाय | त्रीलोकपथाय त्रिलोकनाथाय
श्री महाविष्णूस्वरूपश्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री
अष्टचक्र नारायणाय नमः”
असे म्हणून धन्वंती देवताला नमस्कार करावा. दीर्घ अविष्यासाठी देवाकडे विनंती करतात.
त्याप्रमाणे अनेक व्यापारी लोक लक्ष्मीची पूजा सुद्धा करतात. पाटावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो मांडून देवीला प्रार्थना करतात.
निष्कर्ष :
भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात.त्या प्रत्येक सणामध्ये काही ना काही महत्त्व आणि पौराणिक कथा आसतात. त्याप्रमाणे आज धनत्रयोदशी किंवा धनतेरस या सणाचे महत्त्व आणि कहाणी बघितलेली आहे.
धन्वंतरी देवता आणि लक्ष्मी देवी या दोघांची पूजा करून निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
या सणाच्या हेमपुष्पा राजाच्या कथेतून आपल्याला कळते की, ठाम निर्णय असेल तर, आपण कुठलेही परिस्थितीवर मात देऊ शकतो. हे आपल्याला या धनत्रयोदशी या सणातून कळून येते.
त्यासोबतच सण म्हणजे घरामध्ये आनंद उत्साह आणि एकोप्याची भावना निर्माण होते.
त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव या सर्वांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.
तर मित्रांनो ! ” धनतेरस पूजा विधी ” मराठी मध्ये । Dhanteras Puja Vidhi in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर ,तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.
” धनतेरस पूजा विधी ” मराठी मध्ये । Dhanteras Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर,कमेंट करून नक्की कळवा.
हे देखील अवश्य वाचा :
- गणेश चतुर्थी माहिती मराठी
- दत्तजयंती बद्दल संपूर्ण माहिती मराठी
- रंगपंचमी सणाची माहिती मराठी
- होळी सणाची माहिती मराठीत
- गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती
धन्यवाद मित्रांनो !