दत्तजयंती बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Datta Jayanti Information in Marathi

By Information Essay •  1 min read

दत्तजयंती बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Datta Jayanti Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” दत्तजयंती बद्दल संपूर्ण माहिती मराठीDatta Jayanti Information in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

दत्तजयंती बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Datta Jayanti Information in Marathi

भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील प्रत्येक कार्य करण्यापूर्वी देव देवतांची आराधना केली जाते. असे म्हणतात की, संपूर्ण सृष्टी मध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. प्रत्येक क देवदेवतांच्या कथा प्राचीन इतिहासात प्रसिद्ध आहे.

कारणामुळेच भारतीय संस्कृती ही एक पवित्र संस्कृती म्हणून सुद्धा ओळखले जाते.

आज आपण या संस्कृतीतील “श्री दत्तात्रेय “ म्हणजेच ” दत्त जयंती “ ची माहिती बघणार आहोत.

भारतामध्ये दरवर्षी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिने दत्त जयंती साजरी केली जाते. परंतु आपल्यातील बहुतेक जणांना दत्त जयंती साजरा करण्यामागील खरी भावना माहितीच नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या आर्टिकल ” Datta Jayanti Information in Marathi “ खूप फायदेशीर ठरेल. कारण आम्ही आज संपूर्ण दत्त जयंती ची माहिती घेऊन आलोत.

दत्त हे एक योगी असून हिंदू धर्मामध्ये त्यांना kiti देव मानले जाते. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, जन्म मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती असा होतो.

दत्तात्रयांनी दीनदलितांच्या सेवा करणाचे व अनाथांचे दुःख व आज्ञानं दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या पश्चात श्रीपाद वल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, व वासुदेवानंद सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानण्यात येतात.

श्री दत्तात्रय किंवा दत्त हे माता अनुसया व अत्रि ऋषी यांचे पुत्र होते. तीन तोंडे ,सहा हात, दोन पाय , चतुर्वेदर्शक चार श्वान जवळ गोमाता असलेले श्री दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकस्वरूप आहेत.

श्री गुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू मानले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या हेतूने श्रीगुरुदत्ता ने संपूर्ण भारताचे भ्रमण केले. ठीक ठिकाणी त्यांची स्थाने निर्माण करून आपली परंपरा चालूच ठेवली.

महाभारताच्या अनुशासित पर्वात देखील श्रीदत्तांचा उल्लेख आढळतो.

स्वधर्म व स्वसंस्कृतीची जोपासना व संरक्षण करणे हे महत्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले.

हिंदू पौराणिक साहित्यानुसार, विष्णूचे अवतार मानला गेलेला दत्ताचे स्वरूप उत्तर काळात ब्रह्मा,विष्णू आणि महेश्वर या तिन्ही देवांचे अंश स्वरूप समजून घेत एक त्रिमूर्ती रूपात आढळतात.

या त्रीमुर्तीचा उल्लेख मल्लिनाथ, बाण, कालिनाथ इत्यादींनी तसेच शुद्रकाने केलेला आढळतो.

श्री दत्त हे योगसिद्धी प्राप्त करून देणारे देवता आहेत. संत एकनाथ महाराज व संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगातून दत्ताच्या त्रिमुखी असण्याचा उल्लेख केलेला आहे.

श्रीदत्तांचा इतिहास । History of Shridatta :

श्री दत्तात्रेय हे इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पुराणा मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या अठराव्या अध्यायात श्री गुरूदत्तांच्या उल्लेख आढळतो.

दत्ताचा उल्लेख त्यांच्या साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्त यांचे पिता असंअत्रि ऋषी हे ऋग्वेदातील पाचव्या मंडळातील ऋचांचे लेखक व संपादक आहेत.

श्री दत्तांचे पूर्ण कुटुंब हे पुराणामध्ये उल्लेखनीय आहे. पुराणात वर्णन केलेल्या दत्त शिष्यांपैकी यदु , आयू, अलर्क, सहस्त्रार्जून आणि परशुराम हे क्षस्त्रीय वृत्तीचे होते.

उपनिषदांत उल्लेख असलेल्या संस्कृती हा दत्त शिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.

दत्त जयंती केव्हा येते । When is Datta Jayanti :

मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस मृग नक्षत्रावर सायंकाळी च्या वेळेस श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी ” दत्त जयंती “ साजरी केली जाते.

तसेच पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तेव्हा देवगन त्या असुरी शक्तीचा नाश करण्यासाठी व सफल झाले.

त्यावेळी ब्रह्मदेवाच्या आदेशावरून वेगवेगळे देव वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यामुळे देवतांना दैत्यांचा नाश करणे शक्य झाले. म्हणून तो दिवस “दत्तजयंती” साजरा केला जातो.

दत्त जयंती का साजरी केली जाते । Why Datta Jayanti is celebrated :

दत्त जयंती साजरा करण्यामागे कुठल्याही प्रकारची विशिष्ट विधी आढळून येत नाही. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस सर्व भक्तजन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दत्त जयंती साजरी करतात.

दत्त जयंती साजरी करण्या पूर्वी सात दिवस अगोदर गुरुचरित्राचे पारायण करण्याची प्रथा आहे. यालाच ” गुरुचरित्रसप्‍तह “ असे म्हणतात.

सर्व दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुष्टांचा नाश करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या तिघांनी एकच स्वरूपी माता अनुसया आणि अत्रीऋषी यांच्या पोटी जन्म घेतला.

दत्ताने म्हणून केलेल्या कार्यामुळे दत्त जयंती साजरी केली जाते.

दत्त जयंती कशी साजरी केली जाते । How Datta Jayanti is celebrated :

मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस संपूर्ण भारतामध्ये दत्त जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते.

दत्तजयंतीच्या दिवशी सर्व दत्ताच्या देवळात भजन, कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

संध्याकालच्या वेळी श्रीदत्तांचा जन्म झाला असे मानतात त्यामुळे त्यावेळी दत्त जन्माचे किर्तन असते.

श्रीदत्ताच्या देवळावर रोषणाई केली जाते. पालखीतून भगवान दत्तात्रयाची मिरवणूक केली जाते.

भारताच्या विविध प्रांतांमध्ये दत्त जयंतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्रातील गांगणापूर, माहुर, नृसिंहवाडी, कर्दळीवन या ठिकाणी श्री दत्ताची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या उत्साहात संगीत किंवा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार आपली कला चे सादरीकरण करतात. केवळ शहरी भागातच नव्हे तर लहान लहान गावांमध्ये सुद्धा दत्त जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते.

श्री दत्तगुरूंची पूजा,आरती, धूप , दीप करून सुंठ वड्यांचा प्रसाद वाटला जातो.

श्री दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र हे विष्णूचे प्रतिक आहेत तर त्रिशूल, डमरू शंकराचे प्रतीक आहे.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने जास्त कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते‌.

त्यामुळे संपूर्ण भारतात दत्त जयंती ही खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते.

दत्तजयंतीच्या कथा । Stories of Datta Jayanti :

दत्तात्रेय जन्माची एक प्राचीन कथा आहे. आमच्या पोटात मुले अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारी ही कथा नक्कीच वाचावी.

एकदा श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया यांची परीक्षा घेण्याचे ठरवतात.

अत्रि मुनी यांची पत्नी अनुसया ही अत्यंत प्रतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती मनोभावाने आपल्या प्रतीची सेवा करत असत. त्यांच्या आश्रमामध्ये येणारा प्रत्येक अतिथीचे ते मनोभावाने सेवा करत असे.

एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे एका ऋषींचे वेश धारण अनुसया व अत्रि ऋषी यांच्या घरी येतात.

दारावर कोणीतरी तिथे आल्याचे पाहून अनुसया बाहेर येते, तेव्हा अतिथीचे वेश धारण केलेले त्रिदेव भिक्षा मागतात. अनुसया अशी इतरांप्रमाणेच त्यांना भिक्षा देते.

दीक्षा मागितल्यानंतर त्रिदेव स्तनपान‌ करण्याची मागणी करतात.

परंतु माता अनुसया पतिव्रता नारी असल्यामुळे ऋषींना निराश न करण्याचे वचन देऊन त्या ऋषींच्या लहान बालकांत रूपांतर करते. व त्यांना स्तनपान करून जीवू सुद्धा घालते आणि झोपवते सुद्धा.

तेव्हा ब्रह्मा ,विष्णू आणि महेश्वर माता अनुसया वर तसं होतात व तिला आपले खरे रूप दाखवतात.

त्यानंतर माता अनुसया ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांच्याकडे आपले बालक व्हावे अशी विनंती करते. तेव्हापासून ह्या तिघांचा संगम श्री दत्तात्रय म्हणून झाला.

दत्ताची उपासना कशी करावी । How to worship Datta :

श्री दत्ताची उपासना करताना काही नियम आहे तो ते पुढील प्रमाणे,

श्री दत्तांना गंध लावताना अनामिका या बोटाने गंध लावावा. श्रीदत्ता ना जाई किंवा निशिगंधाची फुले सात किंवा सातच्या पटीत वहावी.

दत्ता ना चंदन, केवडा, चमेली, जाई किंवा अंबर या गंधाच्या अगरबत्त्या लावाव्यात.

दत्ताला ‘वाळा’ या गंधाच्या अत्तर अर्पण करावे. हे सर्व झाल्यानंतर दत्ताला सात प्रदिक्षणा घालाव्यात.

श्री दत्तांचे स्वरूप । Appearance of Shri Datta :

श्री दत्तात्रय ब्रह्मा,विष्णू आणि महेश्वर असे तीन तोंडी असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडा समोर किंवा अग्नी समोर बसलेले आहेत.

श्री दत्तांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री आणि मागे गाय या स्वरुपात दिसून येते.

स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नसलेले अशा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले श्रीदत्त दिसतात. दत्तांच्या जवळ असलेले चार कुत्री हेमचार वेद आणि शंकराचे भैरव मांनले जातात.

रुद्राक्ष, अंगावर भस्म हे स्मशानात राहणारा शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

 तर मित्रांनो ! ” दत्तजयंती बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Datta Jayanti Information in Marathi “ आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

 ” दत्तजयंती बद्दल संपूर्ण माहिती मराठी । Datta Jayanti Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

हे देखील अवश्य वाचा :

 धन्यवाद मित्रांनो !

Information Essay