Chi sau Ka full form in Marathi | ची.सौ.का म्हणजे काय?

मित्रांनो! आजच्या काळामध्ये तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये, टीव्ही मध्ये किंवा लग्नपत्रिकेवरती मुलीच्या नावासमोर ची.सौ.का हे नाव ऐकले असेल किंवा वाचला असेल. साधारणतः सर्वजण ची सौ का हे वाचतात आणि विसरतात. परंतु कोणी ची.सौ.का चा बारीक पणे विचार केला असता त्याचा अर्थ काय होतो किंवा मराठीमध्ये याचा फुल फॉर्म काय होतो याचा विचार कोणी केला नसेल. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही ची.सौ.का म्हणजे काय? आणि chi sau Ka full form in Marathi घेऊन आलो.

Chi sau Ka full form in Marathi:

Chi sau Ka full form in Marathi ” चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी” आसा होतो.

ची.सौ.का म्हणजे काय?

आपण नेहमी लग्नपत्रिका मध्ये पाहतो की मुलाच्या नावासमोर चिरंजीव किंव्हा ची. असे लिहिलेले असते व मुलीच्या नावासोबत ची.सौ.का असे लिहिलेले असते. परंतु मुलीच्या नावासमोर लिहिलेले ची.सौ.का चा आता खूपच कामी जणांना माहिती असेल.

लग्न पत्रिके मध्ये मुलीच्या नावासमोर ची सौ का लिहिणे हे एक प्रथा मानली जाते आणि ही प्रथा खूप जुन्या काळापासून चालत आलेले आहे त्यामुळे आपण कित्येकदा बऱ्याच लग्न पत्रिकेमध्ये हे वाचले देखील असे आणि वाचून सोडून दील असेल.

परंतु इतर वेळेस मुलाच्या नावासमोर चिरंजीव आणि मुलीच्या नावासमोर चिरंजीवी लिहिलेले असते परंतु लग्नपत्रिकेच्या वेळेस मुलीच्या नावासमोर ची.सौ.का आस का लिहिले जात असावे.

ची.सौ.का यातील ची. चा अर्थ “चिरंजीवी” असा होतो. चिरंजीवी

म्हणजेच अमर किंवा शेवट नसलेला असा होतो आणि का. चा फुल फॉर्म “कांक्षिणी” असा होतो याचा अर्थ “इच्छा बाळगलेली” असा होतो. आणि मधला शब्द तो म्हणजे सौ. याचा अर्थ “सौभाग्य” किंवा “सौभाग्यवती” असा होतो.

सौभाग्य हा शब्द “सु + भाग” या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. आणि आतील भाग या शब्दाचे विविध अर्थ होतात जसे की, सुख, वैभव, सदैव इत्यादी. म्हणून या सर्वांसाठी आपण भाग्य हा शब्द वापरतो. जेव्हा मुलीचे लग्न होते व ती तिच्या घरी जाऊन चांगले सुखाने नांदू लागते तेव्हा तिला सौभाग्यवती असे म्हणतात.

थोडक्यात भाग्य या नावाने वापरला जाणारा भाग हा शब्द स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एकाच अर्थाने वापरला जातो ज्याला इंग्रजीमध्ये ‘लक’ या नावाने ओळखले जाते.

“भाग” या शब्दाचा दुसरा अर्थ तो फक्त स्त्रियांसाठी वापरला जातो म्हणून लग्न पत्रिके मध्ये मुलीच्या नावासमोर ची.सौ.का असे लिहिले जाते आणि हा दुसरा अर्थ स्त्रियांच्या ची.सौ.का शी संबंधित आहे.

“भग” या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे ” स्त्री जननेंद्रिय” असा होतो. हे जननेंद्रिय लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला शारीरिक सुख मिळण्यास पात्र आहेत. त्यातून अपत्य प्राप्ती होवो हा त्या मागचा सर्वात मोठा महत्त्वाचा अर्थ आहे.

पती सुख शेवटपर्यंत मिळो आणि तिचं “मग” शेवटपर्यंत “सुफल” राहो अशी इच्छा बाळगणारी ती ” सौभाग्यकांक्षिणी”.

म्हणूनच लग्न पत्रिकेमध्ये मुलीच्या नावासमोर ची.सौ.का असे लिहिले जाते.

तर मित्रांनो! “Chi sau Ka full form in Marathi | ची.सौ.का म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *