APJ Abdul Kalam Information in Marathi | एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठी

By Information Essay •  1 min read

भारत देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे एपीजे अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ होते. त्याच बरोबर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती देखील होते. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी अनेक महान कार्य केलेले आहेत त्यांच्यामध्ये देशाची तरुण पिढी हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत म्हणून ते तरुण पिढीला नेहमी प्रोत्साहित करत. आजच्या लेखामध्ये आपण याच महान व्यक्तिमत्व बद्दल माहिती जाणून घेऊया.APJ Abdul Kalam Information in Marathi | एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठी

APJ Abdul Kalam Information in Marathi | एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठी:

 देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे “भारतरत्न पुरस्कार” प्राप्त करणारे एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे प्राख्यात वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती तसेच भारत देशाचे “मिसाईल मॅन” म्हणून ओळखले जाणारे एक महान पुरुष व व्यक्तिमत्व आहेत.

एपीजे अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला संघर्ष हा तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी खडतर प्रयत्न करावेच लागतात हे एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन संघर्षातून आपल्याला कळते.

अब्दुल कलाम यांच्या जीवनाचे महत्व आणि त्यांनी आपल्या देशासाठी केलेले कार्य सर्वात तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये वारंवार स्पर्धा परीक्षा किंवा निबंध लेखनातून अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.

कलाम हे एक एरोस्पेस वैज्ञानिक होते तसेच त्यांनी 2002 ते 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती होण्याची कामगिरी पार पाडली. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जीवनामध्ये आणि समस्यांना तोंड देऊन कठोर संघर्ष करावा लागला तरीही ते डगमगले नाही. आणि आपल्या ध्येया वर ते नेहमी दृढ राहिले. एपीजे अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्त्व आणि ते देत असलेले भाषण हे नेहमी तरुण पिढी मध्ये जोश निर्माण करीत होते.

एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म:

डॉ. अवुल पाकिर जैनलाबदीन अब्दुल कलाम म्हणजेच एपीजे अब्दुल कलाम त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वर या ठिकाणी झाला. कलाम यांचे शालेय शिक्षण रामेश्वर या ठिकाणातील एका शाळेमध्ये झाले. अब्दुल कलाम हे लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळेस अब्दुल कलाम गावांमध्ये वर्तमानपत्रे विकून आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करीत होते.

 शाळेमध्ये असताना अब्दुल कलाम त्यांना गणित विषयांमध्ये अधिकच आवड होती.

एपीजे अब्दुल कलाम यांचे शिक्षण:

शालेय शिक्षण घेत असताना एपीजे अब्दुल कलाम यांना अनेक विषयांमध्ये अधिकच रस होता त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण त्यांचे जन्मगाव म्हणजे रामेश्वर या ठिकाणी पूर्ण केले. नंतर त्यांनी तिरुचिरापल्ली या ठिकाणी सेंट जोफेस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी त्यांनी बीएससी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी “मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंतु आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांना पुढचे शिक्षण घेण्याकरिता स्वतःच्या आईचे दागिने गहाण ठेवावे लागले.

 येथून त्यांनी एराॅनाॅटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर त्यांनी अमेरिकेतील “नासा” या प्रसिद्ध संस्थेतून एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य:

एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या भाषणातून आणि कार्यातून नेहमीच तरुण पिढी यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला त्यास व भक्तांना वैज्ञानिक क्षेत्रामध्ये देखील महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

1963 मध्ये भारतीय संशोधन संस्थेमध्ये म्हणजेच इस्रो मध्ये क्षेपणास्त्र विकासातील pslv संशोधनामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी सहभाग नोंदविला. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्या काळामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताचे क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी एपीजे अब्दुल कलाम यांनी वैयक्तिक कामापेक्षा सांगली कामांमध्ये अधिक भर घातला. आपल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या विकासाकडे एपीजे अब्दुल कलाम यांचे खूप लक्ष होते. क्षेपणास्त्र विकास कार्यातील “अग्नी” क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जगभरामध्ये मोठे कौतुक करण्यात आले. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार होण्याचा मान देखील एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाला. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एपीजे अब्दुल कलाम यांनी अनेक नवीन धोरणाचे आखणी केली. तसेच एपीजे अब्दुल कलाम यांनी संरक्षण मंत्राचे सल्लागार व डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम बी टी हा रणगाडा व लाईट कॅबट एअर क्राफ्ट यांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले.

एपीजे अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार:

एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या देशाला लाभलेले एक महान वैज्ञानिक होते. त्यांनी त्यांच्या कार्यातून आपल्या देशाच्या वैज्ञानिक क्षेत्राच्या प्रगतीमध्ये आणखीनच भर घातली. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे मनाने खूप संवेदनशील आणि शांत स्वभावाचे होते.

अशा या महान कार्यामुळे भारत सरकारने एपीजे अब्दुल कलाम यांना “पद्मभूषण” आणि “पद्मविभूषण” या पुरस्काराने सन्मानित केले. तर 1998 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे “भारतरत्न” पुरस्काराने देखील सन्मानित केले. तसेच एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये “जागतिक विद्यार्थी दिवस” म्हणून पाळला जातो.

एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन:

एपीजे अब्दुल कलाम हे तरुण पिढीला जागृत करण्यासाठी नेहमी भाषण करत. असेच एकदा शिलॉंग येथे एपीजे अब्दुल कलाम भाषण करत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. शिलॉंग मधील रुग्णालयामध्ये 27 जुलै 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी शेवटचा श्वास घेतला.

तर मित्रांनो! “APJ Abdul Kalam Information in Marathi | एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठी” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आभार शेअर करा.

धन्यवाद!

Information Essay